Rahul Narwekar : महाराष्‍ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा बिनविरोध निवड
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Narwekar : महाराष्‍ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा बिनविरोध निवड

Rahul Narwekar : महाराष्‍ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा बिनविरोध निवड

Dec 09, 2024 11:43 AM IST

Rahul Narwekar unopposed elected Maharashtra Assembly speaker : गेल्या अडीच वर्षांपासून विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बिनरोध निवड करण्यात आली आहे. आवाजी मतदानाने त्यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्‍ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा बिनविरोध निवड
महाराष्‍ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा बिनविरोध निवड

Rahul Narwekar unopposed elected Maharashtra Assembly speaker : : गेल्या अडीच वर्षांपासून विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बिनरोध निवड करण्यात आली आहे. आवाजी मतदानाने त्यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यासाठी अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानाने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष झाले आहेत. लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे बाळासाहेब भारदे नंतर दुसरे ते दुसरे अध्यक्ष ठरले आहेत. रविवारी राहुल नार्वेकर त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. विरोधकांनी कोणताही उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे आज सकाळी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात ८ आमदारांनी शपथ घेतल्यावर विधान सभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. हंगामी अध्यक्षांनी ही निवडणूक प्रक्रिया राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यासाठी अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानाने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

विरोधी पक्षाकडून उमेदवारी नाही

रविवारी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षनेते चंद्रकांत पाटील आदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभेतील महायुतीचे संख्याबळ लक्षात घेता महाविकास आघाडीकडून एकाही सदस्याने अर्ज भरला नाही.

नार्वेकर यांचा जन्म हा १९७७ साली झाला. ते व्यवसायाने वकील आहे. राहुल नार्वेकर हे ३ जुलै २०२२ रोजी पहिल्यांदा विधानसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाची बरीच चर्चा झाली. आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याची सुनावणी करताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला खरे पक्ष म्हणून निर्णय देण्यात आला. त्यांनी एकाही आमदाराला अपात्र ठरवले नव्हते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंद

राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं. त्यांनी त्यांच्या रूपात कोकणाला प्रतिनिधित्व मिळाले असे देखील म्हटलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, खर तर मी पुन्हा येईन असे म्हटलं नव्हतं. मात्र, राहुल नार्वेकर यांनी तसं न म्हणता ते विधानसभा अध्यक्ष पदी पुन्हा आले आहे. त्यांनी गेल्यावेळी अध्यक्ष असतांना अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी दिले. त्यांनी विधानसभेच्या कामासाठी त्यांची वकिलीची प्रॅक्टिस सोडली. आज ते त्यांचे सर्व कौशल्य अध्यक्ष भूषवतांना पणाला लावतात. राहुल नार्वेकर हे सहजपणे मोठ्या माणसासोबत वावरतात तसे ते गरीबांसोबत देखील वागतात. त्यामुळे कुलबा मतदार संघातून त्यांना मोठ मताधिक्य मिळालं आहे. त्यांच्यात व्यक्तशीर व शिस्तपणा आहे, असे फडणवीस म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या