उद्धव ठाकरेंची आज झालेली पत्रकार परिषद नव्हती तर दसरा मेळाव्याचं भाषण वाटत होतं. मला वाटलं होतं निकाल देताना माझा कोणता निर्णय चुकला हे सांगतील. मात्र त्यांनी केवळ संविधानिक संस्थांबद्दल अपशब्द वापरले, असं प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले की, १० जानेवारी रोजी निकाल दिल्यापासून सातत्याने जे आरोप केले जात आहेत. ते चुकीचे आहेत. मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच निर्णय दिला आहे. कोणालाही संतुष्ट करण्यासाठी मी निकाल दिलेला नाही.
पत्रकार परिषदेत म्हणाले की, संविधानिक संस्थांवर विश्वास नाही ते सगळे अविश्वास निर्माण केलं जात आहे. अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला, परंतु तो कसा चुकीचा आहे, हे सांगण्यात आलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की उपाध्यक्षांनी अजय चौधरी यांच्या निवडीला मान्यता दिली होती ती योग्य आहे आणि मी अध्यक्ष म्हणून भरत गोगावले यांच्या नियुक्तीला दिलेली मान्यता अयोग्य आहे. मात्र हे पूर्णसत्य नाही.
सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, प्रतोद मान्यता देताना राजकीय पक्षाची भूमिका समजून परवानगी द्यावी. तसेच गोगावलेची निवड कायमस्वरूपी अवैध ठरवली नव्हती.
शिवसेनेचे प्रकरण माझ्या समोर आल्यानंतर त्यात दोन गट पडल्याचं उघड होतं. सर्वोच्य न्यायालयाने सांगितले होते की, मूळ राजकीय पक्ष निश्चित करा. ज्यास पक्षास मान्यता मिळेल त्याचा प्रतोद मान्य करा, या तत्वानुसारच निकाल दिला आहे. कोर्टाने कधीच गोगावले निवड गैरकायम स्वरूपी कधीच म्हटलं नाही.
अध्यक्षांनी शिवसेनेची १९९९ ची घटना ग्राह्य धरली मात्र २०१८ ची अयोग्य ठरवली, असं म्हटलं जातं. मात्र मूळ पक्ष कोणाचा हे तपासण्यासाठी तीन निकष ठरवण्यात आले होते. पक्षाची घटना, पक्षाची संरचना या बाबीचा सामावेश होता. न्यायालयाने स्पष्ट सांगितले होतं की, दोन गटांनी वेगवेगळ्या घटनेचा आधार घेऊन दावा केला तर त्यावेळी जे निवडणूक आयोगाकडे जी घटना आली असेल ती ग्राह्य ठरवावी.
यानंतर मी मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून यात स्पष्टता आणली होती. त्यावर निवडणूक आयोगाने कळवलं की, १९९९ ची घटना आपल्याकडे रजिस्टर असून तीच योग्य आहे. त्यानंतर मी आयोगाकडे शिवसेनेच्या सुधारित घटनेबाबत विचारणा केली मात्र आयोगाने कळवले की, २०१८ ची सुधारित घटना रेकॉर्डवर नाही. त्यांनी दावा केला आहे की, सुधारित घटनेची प्रत निवडणूक आयोगाकडे दिली होती, मात्र हे साफ खोटं आहे.
संबंधित बातम्या