Rahul Gandhi : ‘सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली अन् याला मुख्यमंत्री जबाबदार’, राहुल गांधींचा थेट आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Gandhi : ‘सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली अन् याला मुख्यमंत्री जबाबदार’, राहुल गांधींचा थेट आरोप

Rahul Gandhi : ‘सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली अन् याला मुख्यमंत्री जबाबदार’, राहुल गांधींचा थेट आरोप

Dec 23, 2024 04:43 PM IST

Rahul Gandhi in Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. तर पोलिसांनीच त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधींचा पोलिसांवर गंभीर आरोप
राहुल गांधींचा पोलिसांवर गंभीर आरोप

परभणी येथे झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath suryavanshi) या तरुणाचा मृत्यू झाला. आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करीत होता. तो दलित असल्याने पोलिसांनी त्याची हत्या केली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घालण्यासाठी विधानसभेत खोटं वक्तव्य केलं, असा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. सोमनाथच्या मारेकऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

परभणी रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या संविधान प्रतिकृतीची १० डिसेंबर रोजी विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी पोलिसांनी ५० जणांना अटक केली होती. त्यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीतच मृत्यू झाला होता. ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला.आज सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी खासदार राहुल गांधी हे परभणीत आले होते. निळा टी शर्ट परिधान करून राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार तसेच राज्यभरातील नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी २० ते २५ मिनिटे सूर्यवंशी कुटुंबियांशी चर्चा केली.

काय म्हणाले राहुल गांधी -

सूर्यवंशी कुटूंबाची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना तसेच ज्या लोकांना पोलिसांकडून मारहाण झाली, त्यांनाही भेटलो. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट, काही व्हिडिओ व फोटो दाखवले. पोस्टमार्टेम रिपोर्टमधून स्पष्ट झालंय की ही शंभर टक्के हत्या आहे. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथची हत्या केली. सोमनाथ दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात राजकारण न आणता तपास व्हावा.

पोलिसांना पाठिशी घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटं निवेदन दिल्याचं राहुल गांधी म्हणाले.या तरुणाला यामुळे मारण्यात आलं, कारण तो दलित होताआणि तो संविधानाचे रक्षण करीत होता. आरएसएसची विचारधारा संविधान नष्ट करण्याची विचारधारा आहे. याची चौकशी करावी, यात संबंधितांना शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर