Rahul Gandhi in INDIA alliance rally in Mumbai: कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता पक्ष सोडतांना माझ्या आईकडे रडत आला. मी त्यांचं नाव घेणार नाही. ते याच राज्यातील आहेत. त्यांनी माझ्या आईला रडत रडत म्हणाले, सोनियाजी मला लाज वाटते, माझ्यात यांच्याशी लढण्याची ताकद नाही, मला जेलमध्ये जायचं नाही. या नेत्याने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झाला. या यात्रेनंतर रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे इंडिया आघाडी नेत्यांची विराट सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी इंडिया आघाडीचे बडे नेते उपस्थित होते, भाजपवर आरोप करतांना राहुल गांधी म्हणाले, अनेकांना ईडीचा धाक दाखवला जात आहे. त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे. नुकत्याच एका नेत्याने माझ्या आईला फोन केला होता. फोन वर रडत रडत तो नेता म्हणाला, सोनियाजी मला माफ करा. या शक्तिविरोधात लढण्याची माझी ताकद नाही. मला जेल मध्ये जायचे नाही.
अशाप्रकारे आज हजारो लोकांना घाबरवले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, समाजातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि द्वेषावर प्रकाश टाकण्यासाठी त्यांची 'भारत जोडो यात्रा' सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'ईव्हीएम, ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाशिवाय लोकसभा निवडणूक जिंकू शकणार नाहीत. मोदी हा मुखवटा आहे, जो सत्तेसाठी काम करतो. पंतप्रधान मोदींची भ्रष्टाचारावर मक्तेदारी असल्याचा आरोप असून भीतीपोटी शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडून ते सत्ताधारी सरकारमध्ये सामील झाले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या या व्यक्तव्यामुळे त्यांच्या रोख हा अशोक चव्हाण यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे. अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेसला राम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची वर्णी ही लोकसभेवर लावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या