Rahul Gandhi in Mahabaleshwar : राहुल गांधी यांनी मैत्री जपत मित्र रायन बनाजी यांच्या अंत्यविधीसाठी ते सोमवारी महाबळेश्वर येथे आले होते. त्यांनी मित्राच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत धार्मिक विधी पूर्ण होईपर्यंत थांबले. त्यांनी बनाजी यांच्या बंगल्या त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर रायन बनाजी यांच्यावर पारशी स्मशानभूमीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीतच दफनक्रिया पार पडली. अंत्यसंस्काराचे सर्व विधी आटोपल्यावर राहुल गांधी यांनी कुटुंबीयांचा निरोप घेतला.
मुंबई येथील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. बनाजी व राहुल गांधी गांधी यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. गेल्या २२ वर्षांपासून त्यांची मैत्री होती. डॉ. बनाजी यांनी राहुल गांधी यांच्या डोळ्यांची तपासणी करत त्यांच्यावर उपचार केले होते. तेव्हापासून गांधी व बनाजी कुटुंबीयांमधील संबंध दृढ झाले होते. दोघांनी ही मैत्रीचे नाते जपले. डॉ. बनाजी यांचे चिरंजीव रायन हे पोतुर्गालची राजधानी लिस्बन येथे वास्तव्याला होते. काही दिवसांपूर्वी ते जीममध्ये व्यायाम करत असतांना रायन बनाजी यांना हार्ट अटॅक आला. यामुळे त्यांचे निधन झाले होते. रायन यांनी निधनापूर्वी आपले अंत्यविधी महाबळेश्वर येथे व्हावे अशी त्यांची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे मुलाच्या इच्छेनुसार डॉ. बनाजी यांनी त्याचे पार्थिव महाबळेश्वर येथील शापूर हॉल या बंगल्यावर आणले. येथील पारशी स्मशान भूमीत अंत्यविधी पार पडले.
सोमवारी दुपारी साडेबाराला रायन बनाजी यांच्या पार्थिवावर पारशी विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल गांधी यांनी २२ वर्षांची मैत्री जपत मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी महाबळेश्वरला आले. विमानाने पुण्यात येऊन ते पुण्याहून पोलिस बंदोबस्तात राहुल गांधी यांचा महाबळेश्वरचा पोहोचले. सकाळी ९.३० ला राहुल गांधी महाबळेश्वरला पोहोचले. त्यांनी रायन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व बनाजी कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच संपूर्ण विधी होई पर्यंत ते थांबले. दरम्यान, राहुल गांधी यांनी महाबळेश्वर येथे स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे नेते विराज रिदि, सलीम बागवान या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना स्ट्रॉबेरी भेट दिली. दुपारी तीन वाजता राहुल गांधी हे पुन्हा पुण्याला आले व विमानाने दिल्लीला रवाना झाले.
संबंधित बातम्या