मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune news : नशा छोडो बोतल तोडोचा नारा देत पुण्यात फोडली व्यसनमुक्तीची दहीहंडी

Pune news : नशा छोडो बोतल तोडोचा नारा देत पुण्यात फोडली व्यसनमुक्तीची दहीहंडी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 19, 2022 05:42 PM IST

पुण्यात सर्वत्र दहीहंडीचा महोत्सव साजरा होत असताना चंदननगर येथे एक आगळी वेगळी दहीहंडी फोडण्यात आली.

आनंदवन येथे व्यसनमुक्तीची दहीहंडी साजरी करताना
आनंदवन येथे व्यसनमुक्तीची दहीहंडी साजरी करताना

पुणे : पुण्यात सर्वत्र दहीहंडीची धामधूम सुरू असताना पुण्यात चंदन नगर येथील आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रात अनोखी दहीहंडी साजरी करण्यात आली. येथे असणाऱ्यांनी व्यसनमुक्तीचा नारा देत व्यसनमुक्तीची शपथ घेतली. यावेळी व्यसन मुक्तीचा एकच नारा... आयुष्यात व्यसनाला नका देवू थारा... अशा घोषणा त्यांनी देत व्यसनमुक्तीचा पुरस्कार केला.

चंदननगर येथील आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसनमुक्तीची दहीहंडी फोडण्यात आली. व्यसन सोडा फुलेल जीवन, नशा छोडो बोतल तोडो, व्यसनमुक्त समाज घडवूया आनंददायी जीवन जगूया... अशा आशयाचे फलक असलेली दहीहंडी बांधण्यात आली होती. यावेळी जल्लोषात ही दहीहंडी फोडण्यात येऊन आनंदवनमध्ये एका नव्या जीवनाची सुरवात करण्याचा संकल्प संकल्प सर्वांनी केला.

  आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे माहिती देतांना म्हणाले, व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संतोष पटवर्धन, प्रमोद शेळके, गणेश गावडे, केतन जैन, विशाल शिंदे, प्रकाश धिडे,नंदु हरपळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला कोणत्याही प्रकारची नशा न करता देखील सण-उत्सवांचा आनंद घेता येतो. व्यसनाधिन तरुणांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. व्यसनमुक्तीची दहीहंडी फोडून व्यसनांमुळे काय अपाय होतात, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, हे समाजाला या माध्यमातून कळते, असे दुधाने म्हणाले.

WhatsApp channel

विभाग