बलात्कार करण्यात अपयशी ठरल्याने नराधम बोगस डॉक्टराने महिलेची पोट फाडून केली निर्घृण हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बलात्कार करण्यात अपयशी ठरल्याने नराधम बोगस डॉक्टराने महिलेची पोट फाडून केली निर्घृण हत्या

बलात्कार करण्यात अपयशी ठरल्याने नराधम बोगस डॉक्टराने महिलेची पोट फाडून केली निर्घृण हत्या

Jan 05, 2025 12:00 PM IST

Bihar Murder News : बिहारमध्ये एका डॉक्टराने महिलेवर बलात्कार करण्याच्या प्रयत्न केला. तिने विरोध केल्याने आरोपीने तिला जमिनीवर पाडले. मात्र, महिलेने विरोध केल्याने संतापलेल्या डॉक्टरने चाकूच्या साह्याने महिलेचे पोट फाडून तिची हत्या केली.

बलात्कार करण्यात अपयशी ठरल्याने नराधम भोंदू डॉक्टराने महिलेची पोट फाडून केली निर्घृण हत्या
बलात्कार करण्यात अपयशी ठरल्याने नराधम भोंदू डॉक्टराने महिलेची पोट फाडून केली निर्घृण हत्या (File Photo)

Bihar Murder News : बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेवर बलात्कार करण्यात अपयशी ठरलेल्या डॉक्टरने चाकूने तिचे पोट फाडले. ज्यामुळे महिलेचे आतडे बाहेर आले. तिला तातडीने  पूर्णिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिचा मृत्यू झाला.  ही घटना गुरुवारी सायंकाळी केननगर येथील काझा कालव्याजवळ घडली.  शुक्रवारी कुटुंबीय पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता ही घटना उघकडीस आली आहे.  मरंगा पोलीस ठाण्यातील बडी बैठाणा येथील रहिवासी शेखर झा असे आरोपीचे डॉक्टरचे नाव आहे.  

पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी झा हा गावात डॉक्टर म्हणून काम करतो. गुरुवारी सायंकाळी त्यांची मुलगी भाजीपाला खरेदीसाठी काझा बाजारात गेली होती.  आरोपीने तिला बाजारात भेटून घराबाहेर पडतो असे सांगून दुचाकीवर नेले. कझा कालव्याजवळ तो पोहचल्यावर तो घराच्या दिशेने न जाता बाजूला असलेल्या  शेताकडे वळला. मात्र, महिलेने शेताकडे जाण्याबाबत विरोध केला. मात्र, त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.  त्याने तिला जबरदस्तीने शेतात नेल्यानंतर त्याने महिलेवर बलात्कार करण्याच्या प्रयत्न केला. तिला त्याने जबरदस्तीने तिला जमिनीवर पाडले.  

महिलेने त्याला विरोध केला. तिच्यावर बलात्कार करण्यात आरोपी अपयशी ठरल्यानंतर आरोपीने चाकू काढून महिलेचे पोट फाडले, ज्यामुळे तिचे आतडे बाहेर आले. या नंतर आरोपीने महिलेचा गळा कापण्याचा ही प्रयत्न केला, मात्र महिलेने हाताने चाकूचा वार अडवला. यामुळे तिच्या हाताला  दुखापत झाली. महिलेचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी शेताकडे धाव घेतली. यामुळे आरोपीने  घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, स्थानिकांनी व कुटुंबातील सदस्यांनी प्रथम महिलेला स्थानिक दवाखाना जीएमसीएचमध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून  तिला भागलपूरयेथे पाठविण्यात आले. या महिलेला भागलपूरहून पाटणा येथे पाठवण्यात आले होते. अखेर या महिलेला  पूर्णिया येथील खासगी शल्यचिकित्सक रुग्णालयात दाखल करण्यात आले, यावेळी तिचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.  केंगर पोलिस ठाण्याचे प्रभारी नवदीप गुप्ता यांनी सांगितले की, आरोपी महिलेच्या घरी येत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर