मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 05, 2024 09:23 PM IST

Sandalwood Smuggling in Beed : बीडमध्ये पोलिसांनी तब्बल २ कोटी १८ लाखांचा चंदनाचा साठा जप्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात चंदनाचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त
बीडमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त

Sandalwood Smuggling in Beed : दाक्षिणात्य चित्रपटा पुष्पा संपूर्ण देशात चांगलाच गाजला होता. अभिनेता अल्लू अर्जूनचा या चित्रपट चंदन तस्करीवर आधारीत होता. या चित्रपटानंतर छोटे-मोठे चंदनचोरही स्वत:ला पुष्पा समजू लागले. अशीच एक घटना बीड जिल्ह्यतील केजमध्ये समोर आली आहे. पोलिसांनी चंदनाची तस्करी करणारा एक मोठा टेम्पो केज पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हा टेम्पो ताब्यात घेतला. यामध्ये २ कोटी १८ लाख रुपये किंमतीचे जवळपास सव्वा टन चंदन जप्त करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक व वाहकाला अटक आहे. प्राथमिक चौकशीत हे चंदन शरद पवार गटाचे नगरसेवक बालाजी जाधव यांचे असल्याचे समोर आले आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली असून सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

बालाजी जाधव हे बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे कार्यकर्ते आहेत. 

पोलिसांनी १ हजार २३५ किलो चंदनाच्या लाकडांसह आयशर टेंपो असा २ कोटी १८ लाख  ३१  हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. बीड गुन्हे शाखा व केज पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

बीड गुन्हे शाखेले खबऱ्याकडून चंदन तस्करीची माहिती मिळाली होती. चंदनाची लाकडे घेऊन एक आयशर टेंपो केजकडून धारुरकडे असल्याचे समजल्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलिसांनी रविवारी (५ मे) पहाटे साडे चार ते सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान केज-धारुर महामार्गावर सापळा रचला. यावेळी आयशर टेंपो (एमएच२४ एयु ९३८३) च्या हालचाली संशसास्पद वाटल्याने त्याला थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. यावेळी टेंपोमध्ये चंदनाच्या झाडाच्या गाभ्याने भरलेल्या ६० गोण्या आढळल्या. 

पोलिसांनी चालक प्रीतम काशीनाथ साखरे (वय ३४,रा अंबाजोगाई), वाहक शंकर पंढरी राख  (रा.कौडगाव) आणि ज्याच्या सांगण्यावरुन चंदनाचा गाभा जालना येथे घेऊन जात होते, ते मालक बालासाहेब उर्फ बालाजी दत्तात्रय जाधव (वय ४२ वर्षे,रा. केज) या तीन आरोपींविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे

पोलिसांनी सांगितले की, या आयशर टेंपोची रचना पुष्पा सिनेमातील टेंपोप्रमाणे करण्यात आली होती. चालकाच्या मागील भागात एक १० फुट रिकामा कप्पा तयार करण्यात आला होता. त्यात चंदनाचा गाभा ठेवला जायचा आणि त्याच्या मागील बाजुला रिकामे कॅरेट ठेवले जायचे. पोलीसांच्या तपासणीत फक्त  रिकामे कॅरेट आसल्याचे भासवले जायचे. पोलिसांनी या टेंपोच्या रचनेचा पर्दाफाश केला. 

IPL_Entry_Point

विभाग