Pune Rain update : पुण्यात मंगळवारी आणि बुधवारी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढळ तीन दिवस पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी पुण्यात झालेल्या पावसाने रस्त्यांना पुर आला होता. यात अनेक गाड्या वाहून गेल्या होत्या. तर जवळपास सर्वच रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. वाढती आद्रता आणि क्युमुलोनिंबस ढग तयार झाल्याने पुण्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार सकाळी साडेअकरा ते दुपारी एक या दीड तासात वडगावशेरी परिसरात ११४.५ मिलिमीटर या विक्रमी पावसाची नोंद झाली.
क्युमुलोनिंबस ढगांमुळे वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडतो. ही ढगफुटीसारखी स्थिती असली तरी या प्रकारच्या पावसाची अद्याप या श्रेणीत वर्गवारी करण्यात आलेली नाही, असे हवामान तज्ज्ञांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलतांना संगितले.
पुणे वेध शाळेनचे हवामान व अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, 'मान्सूनच्या आगमनामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलावा येत आहे. उच्च तापमानामुळे पुणे आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ढग तयार होत असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी सादृश्य पाऊस झाला.
वडगावशेरी, धानोरी परसिरात तर ढगफूटीसदृश्य पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. धानोरी, विश्रांतवाडी, लोहगाव, सिंहगड रोडसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तर वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. शहरातील अनेक भागात वारंवार वीजपुरवठा खंडित झाला होता.
पुण्यातील सहकारनगर, पर्वती, बिबवेवाडी, कोथरूड आदी भागात पाणी साचल्याच्या अनेक तक्रारी महानगर पालिकेला मिळाल्या. मुसळधार पाऊस झाला असून पाणी साचल्याने अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. बाधित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे,' अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी दिली.
बुधवारी सायंकाळी साडेपाचवाजेपर्यंत लोहगाव येथे ८४ मिमी, तर शिवाजीनगर येथे १७.१ मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील अतिवृष्टीबाबत कश्यपी म्हणाले, 'पावसाळा सुरू होण्यापूर्वी जास्त आर्द्रता, तापमान आणि ढग निर्माण झाल्याने अशा प्रकारचा मुसळधार पाऊस पडतो. तथापि, ही स्थिति अल्प कालावधीसाठी असेल. नैर्ऋत्य मोसमी पावसाचे अद्याप महाराष्ट्रात आगमन झाले नसल्याने या पावसाला मान्सूनपूर्व पाऊस असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
पुणे शहरासह महाराष्ट्र नैर्ऋत्य मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. सध्या मान्सूनची उत्तर सीमा गोवा, गडग, नारायणपेठ, नरसापूर आणि इस्लामपूरमधून जाते, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
संबंधित बातम्या