Kamla Nehru Hospital : पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी घुसल्याचा संशय! NIA, ATS चं पथक घटनास्थळी दाखल-punes kamla nehru hospital suspected of terrorists entering three people are in police custody ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kamla Nehru Hospital : पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी घुसल्याचा संशय! NIA, ATS चं पथक घटनास्थळी दाखल

Kamla Nehru Hospital : पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी घुसल्याचा संशय! NIA, ATS चं पथक घटनास्थळी दाखल

Aug 14, 2024 04:22 PM IST

Pune kamala nehru hospital news : पुण्यात कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुणे पोलिसांचे पथक रुग्णालयात पोहोचले असून तपास केला जात आहे.

खळबळजनक! पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात दहशवादी घुसल्याचा संशय! तिघांना घेतले ताब्यात NIA, ATS चं पथक घटनास्थळी दाखल
खळबळजनक! पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात दहशवादी घुसल्याचा संशय! तिघांना घेतले ताब्यात NIA, ATS चं पथक घटनास्थळी दाखल

Pune kamala nehru hospital news : पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर खळबळ उडाली आहे. पोलिसांचे पथक दवाखान्यात पोहोचले असून तपास सुरू आहे. त्यांनी येथे आलेल्या नागरिकांना रुग्णालया बाहेर काढण्यास सुरुवात केली असून यामुळे दवाखान्यात गोंधळ उडाला होता. मिळालेल्या माहितीनुसार या दवाखान्यात तीन संशयती आले होते. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. पुणे पोलिसांनी दहशतवादी घुसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. असे असले तरी सध्या रुग्णालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सोबतच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व एटीएसचे पथक देखील रुग्णालयात पोहोचले असल्याची माहिती आहे.

पुण्यातील कमला नेहरू या महापलिकेच्या रुग्णालयात सकाळी तीन दहशतवादी घुसले असल्याचा फोन पुणे पोलिसांना आला. खबरदारी म्हणून पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत पथक दवाखान्यात पाठवले. या दवाखान्यात तिघे बांग्लादेशी घुसले असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांचे पथक दवाखाण्यात पोहोचल्यावर अनेकांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी संशयित असलेल्या तिघांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. हे सर्व बिहार येथील असून ते पुण्यातील लोहिया नगर येथील रहिवाशी आहेत. या रुग्णालयात ते रक्ताची चाचणी करण्यासाठी आले होते, असं त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याकडे सध्या आधार कार्ड मिळाले असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. सकाळी ११ वाजता पोलिसांना एक फोन आला आणि एक संशीयत तरुण कमला नेहरू रुग्णालयात आल्याचे सांगितले गेले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

एनआयए आणि एटीएसचे पथक घटनास्थळी

या घटनेची माहिती मिळताच राज्य दहशवाडी पथक आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक कमला नेहरू रुग्णालयात पोहोचले आहे. त्यांच्या मार्फत देखील ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची चौकशी केली जात आहे.

संशयितांची ओळख पटली

ताब्यात घेतलेले तरूण पुण्यात लोहियानगर परिसरात वास्तव्याला असल्याची माहिती आहे. हे सर्व जण मूळचे बिहारचे आहेत. त्यांच्याकडे आधारकार्ड मिळाले असून पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही स्थानिकानी या तरूणांचे फोटो समाजमाध्यमांवर बांग्लादेशी म्हणून टाकून खोटा मेसेज पसरवला होता. हे तरूण कमला नेहरू रूग्णालयात गेले असता समाजमाध्यमांवर फोटो बघितलेल्या काही जणांनी याची माहिती पोलिस कंट्रोलला दिली. त्यानंतर पोलिस तिथे पोहोचले. पोलिसांच्या आता पर्यंतच्या चौकशीत ते दहशतवादी किंवा बांग्लादेशी असल्याच आढळून आलेलं नाही.

विभाग