Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

May 17, 2024 10:49 AM IST

Pune-Mumbai trains cancelled : पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस या महत्वाच्या गाड्या आहेत. मात्र, सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे या गाड्यांच्या फेऱ्या पुढील काही दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.

पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस या महत्वाच्या गाड्या आहेत. मात्र, सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे या गाड्यांच्या फेऱ्या पुढील काही दिवस  रद्द करण्यात आल्या आहेत.
पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस या महत्वाच्या गाड्या आहेत. मात्र, सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे या गाड्यांच्या फेऱ्या पुढील काही दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.

Pune-Mumbai trains cancelled : पुण्याहून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. रोज हजारो पुणेकर मुंबईला रेल्वेने जात असतात. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम आज पासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यावरून मुंबईला जाणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे.

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे सर्वात मोठे आणि जुने रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणी २४ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १० आणि ११ च्या विस्तारासंदर्भात कामे सुरू आहेत. प्री नॉन-इंटरलॉकिंग (एनआई) कामांसाठी विशेष ब्लॉक चालवणार आहे. यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला आहे.आज शुक्रवारी रात्रीपासून ते १ जूनपर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्री सहा तासांचा ब्लॉक राहणार आहे. या सोबतच मुंबई येथे पुण्याहून येणाऱ्या काही रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर (सीएसएमटी) २८ मेपासून येणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या दादरपर्यंत धावणार आहेत. तर पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेससह रद्द केल्या आहेत. प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे हे काम दीर्घकाळ चालणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस (२८ मे ते २ जून) यांचा समावेश आहे. पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (३१ मे ते २ जून); पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि कुर्ला-मडगाव-कुर्ला १ आणि २ जून रोजी रद्द करण्यात आली आहे.

गाड्यांचे वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे हे काम दीर्घकाळ चालणार असल्याने पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. पुढील १५ दिवस या गाड्या रद्द राहणार असल्याने पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र, हाल होणार आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर