मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune To Lonawala : पुणे-लोणावळा नवी लोकल सुरु! शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार गाडी; 'या' आहेत वेळा

Pune To Lonawala : पुणे-लोणावळा नवी लोकल सुरु! शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार गाडी; 'या' आहेत वेळा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 13, 2024 01:27 PM IST

Pune To Lonawala Local: पुण्यातून दुपारी लोणावळ्यात जाण्यासाठी गाडी नव्हती. या वेळत लोकससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी अनेकवेळा पुणेकरांनी केली होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

Pune To Lonawala Local
Pune To Lonawala Local

Pune to lonavala local news : पुण्याहून तसेच लोणावळ्याहून पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थी, कर्मचारी हे कामानिमित्त पुण्यात आणि पुण्याहून अनेक नागरीक हे लोळवण्यात जात असतात. मात्र, रेल्वेकडून दुपारी असणारी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. ही लोकलसेवा पुन्हा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी अनेक आंदोलने केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून आता पुन्हा दुपारच्या वेळेत लोकलसेवा ही सुरू करण्यात येणार आहे. ही गाडी शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरून दुपारी १२.५ मिनिटांनी सोडण्यात येणार आहे.

Arvind Kejriwal : समन्स वर समन्स! दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीने पाठवली चौथ्यांदा नोटीस; अडचणीत होणार वाढ

मुंबई प्रमाणेच पुण्यातही पुणे लोणावळा लोकलसेवेच्या अनेक नागरीक लाभ घेत असतात. पुण्यातून सकाळी, दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेत या लोकल गाड्या असतात. मात्र, करोनाच्या काळात दुपारची रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोना काळ संपून देखील ही सेवा पूर्ववत करण्यात आलेली नव्हती. दुपारच्या वेळेतील लोकल बंद असल्याने विद्यार्थी व कामाला जाणाऱ्या नगरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे ही लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी वारंवार होत होती. मात्र, प्रशासनाकडून दुपारच्या वेळेत देखभाल दुरुस्तीची कामे केली जात असल्याचे कर सांगून ही सेवा सुरू केली जात नव्हती.

जे घरंदाज आहेत, त्यांनीच घराणेशाहीवर बोलावे; उद्धव ठाकरेंचा मोदींना बोचरा टोला

शुक्रवारी सकाळी देखील दुपारची लोकलसेवा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी लोणावळा येथे ‘डेक्कन क्वीन’ अडविण्यात आली होती. अखेर या आंदोलनानंतर आता रेल्वे प्रशासनाने दुपारच्या वेळेत शिवाजीनगर येथून एक व लोणावळा येथून एक अशी लोकल सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

ही नवी लोकल गाडी शिवाजीनगरहून १२ वाजून पाच मिनिटांनी सुटेल. ती १२ वाजून ४५ मिनिटांनी लोणावळा येथे पोहोचेल.

तर लोणावळा येथून सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी लोकल सोडण्यात येणार असून ही गाडी शिवाजीनगर येथे ए१ वाजून २० मिनिटांनी पोहचणार आहे.

ही नवी रेल्वे सेवा सुरू झाल्याने रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी स्वागत केले आहे. या नव्या गाडीमुळे प्रवाशांची अडचण दूर होईल अशी आशा देखील शहा यांनी व्यक्त केली.

WhatsApp channel