Pune Water Issue : पुणेकरांची पाण्याची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त पाण्याची मागणी सातत्याने होत असते. मात्र, यावर आता जलसंपदा विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. शहराच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी महापालिकेने पाण्याच्या पुनर्वापर, सांडपाण्यावर प्रक्रिया व धरणांमधील पाण्याचे आरक्षण बिगर सिंचनासाठी वाढविण्यास लागणारा भुर्दंड सोसावा तसेच अर्टीची पूर्तता केल्याशिवाय पुण्याला अतिरिक्त पाणी वाढून देणार नक्षी अशी भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे पुणेकरांना वाढीव पाणी मिळणार की नाही हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. पुण्यात आता ३४ गावे आली असून या गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पुण्यात अनेक मोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. मात्र, त्याच्या पाण्यासाठी कोणत्याही ठोस उपाय योजना होतांना दिसत नाही. त्यामुळे पुण्याला वाढीव पाणी द्यावे अशी मागणी होत होती. पुण्याला दरवर्षी साधारण १० ते ११ टीएमसी पाणी लागतं. मात्र, वाढती लोकसंख्या पाहता यात वाढ करण्याची मागणी होती. मात्र, यावर जलसंपदा विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. राज्य सरकारच्या पाण्याच्या धोरणात महापालिकेलाही सामावून घ्यावे लागेल, असे जलसंपदा मंत्री म्हणाले.
यशदामध्ये कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यांमधील नदीजोड प्रकल्पांबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेनंतर राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. जलसंपदा विभागाने पुण्यासाठी १४ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला असून . प्रत्यक्षात महापालिका २१ टीएमसी पाणी घेते. असे असतांना देखील पालिका जलसंपदा विभागाकडे अतिरिक्त पाण्याची मागणी करत आहे. मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी पुणे पालिका घेत असल्याने पुणे महानगर पालिकेला नोटीस बजावण्याचे आदेश विखे पाटील यांनी दिले आहे.
विखे पाटील म्हणाले, बांधकाम व्यावसायिक सामान्यांचे पाणी पळवत आहे. त्यामुळे सामान्य पुणेकर पाण्यापासून वंचित राहत आहे. पाणी कमी पडते म्हणून सरकारकडे बोट दाखवायची भूमिका यापुढे चालणार नाही. त्यामुळे पालिकेला देखील पाण्याचा योग्य वापर करून नियमावली पाळावी लागणार आहे. अतिरिक्त पाण्यासाठी पुणे महानगर पालिकेले ३० ते ४० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे. हे पाणी शेतीसाठी किंवा वापरले जाऊ शकते. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीत सोडल्यास पाण्याचा कोटा वाढवून देता येईल, असे विखे पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या