Pune Viral News : पुणे तेथे काय उणे असे नेमहीच म्हटलं जात. पुणे कधी काय शक्कल लावतील याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी एका तरुणानं त्याची गाडी चोरीला गेल्यावर थेट पोस्टर लिहून चोराला गाडी परत करण्याचे आवाहन केले होते. ही घटना ताजी असतांना आता एका पुणेरी कारचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. सध्या दिवाळी असून अनेक जण आपल्या घरांना विद्युत रोषणाई करतात. आकाश दिवे लावतात. मात्र, पुण्यातील एका तरुणाने मात्र, चक्क त्याच्या गाडीला दिव्यांच्या माळा लावून लायटिंग केली आहे. त्याच्या या कारचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, त्यामुळे पुणे तेथे काय उणे याची प्रचिती आता पुन्हा आली आहे.
सध्या दिवाळी सुरू आहे. दिवाळीत सगळीकडे उत्साही वातावरण आहे. या उत्साही वातावरणात पुण्यातील तरुणाईचा उत्साह देखील रस्त्यावरून दिसून येत आहे. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तरुणाई एकत्र येत असतं. अशाच एका उत्साही तरुणाने चक्क त्याच्या गाडीला विद्युत माळा लावत रोषणाई केली आहे, त्याने ही गाडी फर्ग्युसन रस्त्यावर फिरवली असून अनेकांनी या गाडीचा व्हिडिओ काढून सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.
पुण्यातील या व्हायरल व्हिडिओत फर्ग्युसन कॉलेज मार्गावर एक कार उभी असून ती सवण्यात आली आहे. ही कार फुलाने नाही तर लाइटिंगने सजवली व्हिडिओत दिसत आहे. ही कार येणार्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्याने हा व्हिडिओ शेजार केला त्याने देखील पुणे तेथे काय उणे असे लिहिलं आहे. हा व्हिडिओ पुणे_टूर_१२ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आणि त्यात 'वाढीव पुणेकर' असं लिहिण्यात आलं आहे.
या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही गाडी धानोरी परिसरात दिसत असून ही कार बाहेरून पुण्यात आली असल्याचं त्यानं लिहिलं आहे. तर अनेकांनी पुणे तेथे काय उणे अशी प्रतिक्रिया व्हिडिओवर दिली आहे.