मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune jilha parishad : पुणे जिल्हा परिषदेत चाललयं काय! बोगस शाळांच्या यादीवरून वाद चव्हाट्यावर

Pune jilha parishad : पुणे जिल्हा परिषदेत चाललयं काय! बोगस शाळांच्या यादीवरून वाद चव्हाट्यावर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 21, 2023 02:21 PM IST

Pune jilha parishad: अनधिकृत शाळांच्या मुद्यावरून पुणे जिल्हा परिषदेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. हवेली तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या बोगस शाळांच्या यादीवरून हा वाद सुरू झाला आहे.

pune zp
pune zp

Pune jilha parishad : निम्मे वर्ष उलटल्यावर मध्येच ८ ऑक्टोबर रोजी हवेलीच्या गटशिक्षणाधिकारी नीलिमा म्हेत्रे यांनी तालुक्यातील बोगस शाळांची यादी जाहीर केल्याने प्रशासनातील वाद चव्हाट्यावर आला आहे. हे प्रकरण त्यांना भोवण्याची दाट शक्यता आहे. ही यादी मध्येच कशी जाहीर झाली. याला परवानगी कुणी दिली ? या संदर्भात उत्तरे शोधण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी शिक्षण विभागाला दिले.

ट्रेंडिंग न्यूज

Amravati crime news : तू मटण खाल्लंस म्हणून भारत हरला, असं म्हणत थोरल्यानं केला धाकट्या भावाचा खून, वडिलांनाही मारहाण

जिल्ह्यातील बोगस शाळांना चाप बसावी या साठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे बोगस शाळांची तपासणी केली जाते. दरम्यान, ही यादी साध्या कागदावर करण्यात आल्याने संभ्रम वाढला होता. ही यादी दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात सादर केली जाते. मात्र, यंदा ही यादी केवळ हवेली तालुक्याची प्रसिद्ध झाली. मात्र, ही यादी मार्च एप्रिलमध्ये सादर न करता निम्मे वर्ष उलटल्यावर ८ ऑक्टोबरमध्ये करण्यात आली.

Yerawada jail news : सुरक्षेचे कडे भेदून अट्टल गुन्हेगार येरवडा जेलमधून फरार; कारागृह प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात

दरम्यान तालुका स्थरावर प्रसिद्ध झालेली ही यादी मध्येच कशी प्रसिद्ध झाली, याची कोणतीही माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे नसल्याने त्यांनी या संदर्भात संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्याला खुलासा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आता या प्रकरणाची गंभीर दाखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी घेतली असून त्यांनी देखील या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे.

या संदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण म्हणाले, अधिकृत शाळांची 'यादी जाहीर करण्याचे नियम आहेत. हवेली तालुक्यातील १५ शाळांची यादी जाहीर करण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला माहिती न देता परस्पर जाहीर करण्यात आली. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल देण्याचा आदेश दिला आहे. दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

 

WhatsApp channel

विभाग