मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Tilak Road Crime : धक्कादायक! मैत्रिणीला मॉडलिंगला नेल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

Pune Tilak Road Crime : धक्कादायक! मैत्रिणीला मॉडलिंगला नेल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 07, 2024 06:20 AM IST

Pune Tilak Road Crime : पुण्यात (Pune tilak Road) गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. किरकोळ कारणावरून एकमेकांचा जीव घेण्याच्याची घटना उघडकीस आल्या आहेत.

 मैत्रिणीला मॉडलिंगला नेल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
मैत्रिणीला मॉडलिंगला नेल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

Pune Tilak Road Crime : पुण्यात (Pune tilak Road) गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. किरकोळ कारणावरून एकमेकांचा जीव घेण्याच्याची घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना टिळक रस्त्यावर घडली आहे. मैत्रीणीला मॉडलिंगसाठी नेल्याने एका सराइत गुन्हेगारने एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सराइतासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune Cyber Crime : ऑनलाइन रेटिंग जॉबच्या नादात फसला; तरुणाला ४३ लाख ८२ हजारांचा गंडा

ओम गायकवाड, त्याचे साथीदार आनंद, रोहन, सुमीत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात वेदांत राजकुमार शिंदे (वय १९, रा. लोहियानगर, गंज पेठ) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप गायकवाड हा सराइत गुन्हेगार आहे. गायकवाडच्या मैत्रिणीला वेदांतने मॉडलिंगसाठी नेले होते. त्यामुळे गायकवाड वेदांतवर चिडला होता. मंगळवारी सायंकाळी आरोपी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी वेदांतला टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय परिसरात गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन चौघे जण पसार झाले.

Maharashtra Economy : महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ‘रोडमॅप-२०३५’ तयार – देवेंद्र फडणवीस

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे तपास करत आहेत.

विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

विवाहाच्या आमिषाने एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दशरथ गायकवाड (वय २७, रा. शिवनेरीनगर, बागवान चौक, कोंढवा खुर्द) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणी आणि गायकवाड यांची ओळख होती. गायकवाडने तिला विवाहाचे आमिष दाखवले. विवाहाच्या आमिषाने त्याने तरुणीला हांडेवाडी भागातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणी गर्भवती झाली. तेव्हा त्याने तिला धमकावून लष्कर भागातील एका रुग्णालयात नेले. तेथे गर्भपात केला. त्यानंतर त्याने पुन्हा तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहास नकार दिला. तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्या. विवाह करण्यास नकार देऊन त्याने तिला धमकावले. अखेर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली.

WhatsApp channel