Pune Crime: काम कर, चांगलं राहा; वडिलांचा सल्ला ऐकून मुलाची सटकली, झोपेतचं जन्मदात्याला संपवलं!
Pune Youth Kills Father: पुण्यातील विश्रांतीवाडी परिसरात पोटच्या मुलाने जन्मदात्या पित्याच्या पोटात कात्री भोसकून त्यांची हत्या केली.
Pune Murder: पुण्यातील विश्रांतीवाडी परिसरात पोटच्या मुलानं जन्मदात्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मुलगा कामधंदा करत नसल्यानं वडिलांनी त्याला चांगलं राहण्याचा आणि काम करण्याचा सल्ला दिला. परंतु, आरोपीनं स्वत:मध्ये बदल करण्याऐवजी गाढ झोपेत असलेल्या जन्मदात्याच्या छातीत आणि पोटात कात्रीनं वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला.
ट्रेंडिंग न्यूज
लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय, ५५) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय, २०) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपी शिवनाथ काही कामधंदा करत नसल्यानं लक्ष्मण यांनी त्याची समजूत काढून त्याला वारंवार चांगला राहण्याचा आणि काम करण्याचा सल्ला द्यायचे. यावर संतापलेल्या शिवनाथनं मध्यरात्री गाढत झोपेत असलेल्या वडील लक्ष्मण यांच्या छातीत आणि पोटात कात्रीने वार केले.
दरम्यान, पती लक्ष्मण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शिवनाथची आई झोपेतून जागी झाली. यानंतर तिनं शिवनाथला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, शिवनाथनं त्याच्या आईवरही कात्रीनं हल्ला केला, ज्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी शिवनाथचा मामा बाबू दांडेकर यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी शिवनाथला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केलीय. मात्र, या घटनेनं परिसरात खळबळ माजली.
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यात व शहरात दररोज हत्या, चोरी, दरोडा, बलात्कार यांसारख्या घटना घडत आहेत. अशा गुन्ह्यात अटक करण्यात झालेल्या गुन्हेगारांना पोलीस प्रशासन जन्माची अद्दल घडवली जातेय. मात्र, तरीही अशाप्रकारच्या घटना कानावर पडत आहेत.
विभाग