Pune Gangrape News: पुण्यातील स्वारगेट येथे एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी महिलेच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा तिने दावा केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत महिला स्वारगेट येथील एका वसाहतीत भाड्याने राहायला होती. ती आणि तिचा पती कामानिमित्त पुण्यात आले. दरम्यान, जून महिन्यात आरोपी सोहेल पीडिताच्या घरी आला आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास मुलांना जीवे मारू, अशी धमकी त्याने पीडिताला दिली. यानंतर आरोपी कालू आणि सोहेल यांनी तिला धमकावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.बलात्काराच्या घटनेनंतर पीडिता आपल्या मूळ गावी निघून गेली. त्यावेळी तिसरा आरोपी दिलदारने फोनद्वारे पीडिताशी संपर्क साधला. तसेच या घटनेची पोलिसांना माहिती देऊ नको, अशी धमकी दिली.
पीडित महिला राजस्थानला गेल्यानंतर तिने तेथील पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण स्वारगेट पोलिसांकडे सोपवले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करीत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून याप्रकरणातील आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला आहे.
उत्तराखंडमधून संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने पोटच्या ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करून फरार झाला आहे, अशी फिर्याद आरोपीच्या पत्नीने पोलिसांत दिली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. उधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूरमध्ये ही लाजिरवाणी घटना समोर आली आहे. आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक पथके तयार करण्यात आली असून लवकरच फरार आरोपीला अटक करून तुरुंगात पाठविण्यात येणार आहे.