Pune Crime: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असताना पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली. विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून तरुणीवर तब्बल पाच वर्ष अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेने कोंढवा पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
रचित संतोष गोयल (वय, ३४) असे आरोपीचे नाव असून तो घोरपडी येथील कवडे रस्ता येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर पीडित महिलेची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर आरोपी आणि पीडिता यांच्यातील जवळीक वाढली. पुढे आरोपीने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर पुन्हा तिच्यासोबत शाररिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडिताने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०२३ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तो विवाहित असल्याची बाब लपवून विवाह नोंदणी संकेतस्थळावर नाव नोंदवले.
मध्य प्रदेशच्या इंदूर येथे एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली इंदूर पोलिसांनी लष्करी नाईकला अटक करण्यात आली. इंदूर महिला ठाण्याच्या प्रभारी कौशल्या चौहान यांनी एएनआयला सांगितले की, महिलेने पोलिस ठाण्यात येऊन आर्मी नाईकविरोधात तक्रार केली. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा असून सध्या तो आसाममध्ये आर्मी नाईक पदावर तैनात आहे. आरोपीने शुक्रवारी रात्री त्याने इंदूरमधील एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ग्लास घातला, अशी तक्रार महिलेने केली आहे. मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आरोपीविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्या चौहान यांनी दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.