मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune weater update: पुण्यात रेकॉर्डब्रेक थंडी! हंगामातील सर्वात कमी ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Pune weater update: पुण्यात रेकॉर्डब्रेक थंडी! हंगामातील सर्वात कमी ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 24, 2024 02:17 PM IST

Pune weater update: पुण्यात आज सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक कमी तापमान शिवाजीनगर आणि हवेली येथे नोंदवल्या गेले. सकाळी आणि रात्री गारठा वाढल्याने पुणेकर शेकोटीचा आधार घेत आहेत.

Pune weater update
Pune weater update

Pune Temperature Forecast : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलाच चढ उतार जाणवत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली असून बुधवारी रेकॉर्ड ब्रेक तापमान नोंदवण्यात आले. बुधवारी सकाळी तापमानाचा पारा हा चांगलाच घसरला. ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शिवाजीनगर येथे झाली तर त्या खालोखाल हवेली तालुक्यात ८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्या गेले. पुढील दोन दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

Maharashtra weather update : विदर्भाला अवकाळीचा फटका! आजही पावसाचा अलर्ट; राज्यात गारठा वाढला

पुणे शहरसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. सकाळी धुके आणि थंडी तर दुपारी उन आणि रात्री पुन्हा कडक्याच्या थंडीने पुणेकर बेजार झाले आहे. हवामान कोरडे असल्याने तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात असतांना पुण्यात तापमानात कमालीची घट झाली आहे. बुधवारी पुण्यात मोठ्या प्रमाणात तापमान कमी झाले. काही ठिकाणी १० ते १२ तर काही ठिकाणी ९ पेक्षाही तापमान खाली गेले होते. या वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहे. पुण्यात शिवाजी नगर येथे ९.७ तर हवेली येथे ८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्या गेले. तर हडपसर, खेड,चिंचवड, आबेगाव, बालेवाडी, इंदापूर, पाषाण, माळीण, एनडीएसह या ठिकाणी देखील तापमानात मोठी घट झाली आहे.

Mumbai Weather Update : मुंबईतील तापमानाचा पारा १४.८ अंशांवर; हंगामातील सर्वात कमी तापमान

पुण्यात आकाश मुख्याता निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तास आकाश वेळोवेळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर पुढील ७२ तास सकाळी धुक्याचे प्रमाण जास्त राहणार असल्याने दृश्यमानतेत घट होणार आहे. आज सकाळी शिवाजीनगर येथे ९.७ डिग्री सेल्सिअस एवढे कमी तापमान नोंदवले गेले. तर एनडीए, पाषाण परिसरात देखील सर्वाधिक कमी तापमान नोंदवल्या गेले.

पुण्यात वडगावशेरी येथे १७.५, मगरपट्टा येथे १६.८, लव्हळे येथे १६.६, खेड येथे १५.५, चिंचवड येथे १५.५, आंबेगाव येथे १४.९, गिरीवन येथे १३.४, दापोडी १३.३, बालेवाडी येथे १२.९, नारायणगाव येथे १२.९, हडपसर १२.८, शिरुर येथे १२.८, डुडुळगाव १२.४, भोर येथे १२.४, लोणावळा येथे १२.३, तळेगाव ११.९, ढमढेरे येथे ११.१, पुरंदर येथे ११, दौंड यह १०.९, लवासा येथे १०.८, इंदापूर येथे १०.५, पाषाण येथे १०.१, निमगिरी येथे ९.९, बारामती येथे ९.८, राजगुरुनगर येथे ९,७, शिवाजी नगर येथे ९.७, हवेली येथे ८.७, एनडीए येथे ८.२, तर माळीण येथे ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

 

WhatsApp channel

विभाग