मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune weather : पुणे महाबळेश्वरपेक्षाही थंड; तापमानाचा पारा आज ८.६ अंशांखाली

Pune weather : पुणे महाबळेश्वरपेक्षाही थंड; तापमानाचा पारा आज ८.६ अंशांखाली

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 25, 2024 12:07 PM IST

Pune weather update : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमी तापमानाची नोंद झाली. आज पुण्यात शिवाजीनगर येथे ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नाशिकच्या निफाडमध्ये केवळ ४.४ तापमानाची नोंद झाली.

Pune weater update
Pune weater update

Pune weather update : पुणे सध्या महाबळेश्वर पेक्षाही थंड आहे. पुण्यात आज देखील तापमानात मोठी घट झाली. शिवाजी नगर यह ८.६ तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरात ७.६ एवढे कमी तापमान नोंदवले गेले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातिल माळीन येथे ७.८, शिरूर मध्ये ७.४. तर बारामती येथे ८.७ तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने पुढील काही दिवस आणखी तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला! पुणे, मुंबई गारठले तर विदर्भात पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होणार आहे. सध्या पुण्यात माळीन येथे सर्वात कमी ७. ४ तापमान नोंदवल्या गेले. पुण्यात पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. पुण्यात सकाळच्या सुमारास धुके आणि कडक थंडी जाणवत आहे. पुढील ४८ तासात पुण्यात धुके पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील २४ तासात किमान तापमानात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे. २९ जानेवारी पर्यंत किमान तापमान जास्त काही बदल होणार नाही, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Maratha March : मराठा मोर्चा उद्या मुंबईत धडकणार; शहरात वाहतूक कोंडीची शक्यता, जाणून घ्या सविस्तर माहिती

सध्या उत्तर भारतात कमालीची थंडी पडत आहे. हे वारे राज्याच्या दिशेने येत असल्याने थंडी वाढली आहे. तर हवेची एक द्रोणीय रेषा ही दक्षिण कर्नाटका मधून विदर्भ व छत्तीसगड पर्यंत गेली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावर उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर हवेच्या वरच्या थरात एक चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे आद्राता देखील वाढली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहणार आहे.

पुण्यात वडगावशेरी येथे १७, लव्हळे येथे १७, लोणावळा येथे १६.२, मगरपट्टा येथे १५.५, खेड येथे १४.७, कोरेगावपार्क १४.४, बालेवाडी १३.४, चिंचवड येथे १४.९, आंबेगाव येथे १०.० गिरीवन येथे १३.१, दापोडी येथे १३, नारायणगाव १०, हडपसर १२.२, शिरुर १२.८, डुडुळगाव १२.०१, भोर १२.२, तळेगाव १०.४, ढमढेरे १०.३, पुरंदर १०.९, दौंड ९,२, लवासा ११, इंदापूर ११.१, पाषाण ९.५, निमगिरी १०.२, बारामती ८.७, राजगुरुनगर ९.४, शिवाजी नगर ८.६, हवेली ७.८, एनडीए ७.६, माळीण ७.४ एवढ्या तापमानाची झाली.

नाशिकच्या निफाडमध्ये केवळ ४.४ अंश सेल्सिअस तापमान

नाशिकमध्ये देखील तापमानात मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. नाशिकमध्ये मागील तीन दिवसांपासून थंडी वाढली असून निफाडमध्ये राज्यातील सर्वात कमी ४.४ एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली. तर नाशिक शहरात ८.६ एवढे कमी तापमान होते. निफाडमध्ये मंगळवारी आज ४.४, बुधवारी ५.६ तापमान होते. थंडी पासून वाचण्यासाठी येथे शेकोट्यांचा आधार नागरिक घेत आहेत.

WhatsApp channel