Pune Water Crisis : पुण्यात पाणीबाणी! शेकडो टँकरने शहरासह ग्रामीण भागात पाणीपुरवठा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Water Crisis : पुण्यात पाणीबाणी! शेकडो टँकरने शहरासह ग्रामीण भागात पाणीपुरवठा!

Pune Water Crisis : पुण्यात पाणीबाणी! शेकडो टँकरने शहरासह ग्रामीण भागात पाणीपुरवठा!

Apr 07, 2024 09:30 AM IST

Pune Water Crisis : धारणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. (Pune Water Supply Crisis) पुण्यात शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

पुण्यात पाणी बाणी! शेकडो टँकरने शहरासह ग्रामीण भागात पाणीपुरवठा
पुण्यात पाणी बाणी! शेकडो टँकरने शहरासह ग्रामीण भागात पाणीपुरवठा

Pune Water Crisis : पुणे जिल्ह्यात १५ पेक्षा अधिक धरणे आहेत. मात्र, या धारणांनी आता तळ गाठला आहे. यामुळे शहरात आणि ग्रामीण भगात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सध्या १०० पेक्षा अधिक टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. एप्रिल महिन्यात ही परिस्थिती असून आणखी दोन महीने पाण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.

ED Action on vips group : पुण्यात ईडीची मोठी कारवाई! ‘व्हीआयपीएस’ कंपनीची २४ कोटींची मालमत्ता जप्त; संचालक दुबईत फरार

पुण्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पारा ४० शीच्या जवळपास पोहचला आहे. अशातच पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. पुण्यात अनेक मोठी धरणे आहेत. पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या चारही धरणात पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाणी पुरवायचे कसे हा प्रश्न आता प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. सध्या पुण्यात मोठ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पुणे महापालिकाकडून दररोज ११५० टँकर्सने वेगवगेळ्या भागात पाणी पुरवले जात आहे. मात्र, हे पाणी देखील कमी पडत आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा! विदर्भात 'या' जिल्ह्यात ऑरेंज व यलो अलर्ट

जमिनीतील पाण्याचा मोठा उपसा

पुण्यात धरणातील पाणी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा होऊ लागला आहे. अनेक टँकर लॉबी ही बोरवेलचे पाणी उपसून तळ्यात जमा करून ते पाणी टँकरच्या मध्यमान्यतून सोसायट्यांना विकले जात आहे.

किंग कोहलीच्या शतकावर बटलरच्या १०० धावा भारी, संजूची कॅप्टन्स इनिंग, राजस्थानचा धमाकेदार विजय

टँकर लॉबी सक्रिय

पुण्यात मोठ्या प्रमाणात सोसायट्या आहेत. या सोसायट्यांना पाण्यासाठी प्रामुख्याने टँकरवरच अवलंबून राहावे लागते रोज कीमान ५ ते ६ टँकर सोसायटयांना विकत घेण्याची वेळ आली असून यामुळे टँकरलॉबीचे फावले आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल टँकर लॉबी या पाण्याच्या खरेदी विक्रीतुन पुण्यात करत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. मात्र, नागरिक त्यांना आधी पाणी प्रश्न सोडवा आणि मगच मत मागायला या असे बोलून दाखवत आहे.

अनेक भागात पाणी प्रश्नामुळे निवडणूक मतदानावर बहिष्कार

पुण्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय पाण्याच्या मागणीसाठी फोडले. तर अनेक भागात पाणी नसल्याने नागरिकांनी नो वॉटर, नो वोट असे पोस्टर्स लावून मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर