Pune Viral Video : पुणे तेथे काय उणे ही म्हण संपूर्ण देशात प्रचीत आहे. पुण्यात रील तयार करण्यासाठी काही तरुण इमारतीवर लटकतात तर कही तरुण गाडीवर स्टंट करत असतात. दरम्यान, पुण्यात हीट अँड रनचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या घटन ताज्या असतांना आता पुण्यातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पुण्यातील व्हिडिओत एक पीक अप गाडी दिसत आहे. पुण्यातील हडपसर येथे वैदूवाडी उड्डाण पुलावरच्या रस्त्यावर ही पीक अप गाडी चक्क विना ड्रायव्हरची धावत आहे. विशेष म्हणजे ही गाडी पुढे नाही तर रिव्हर्स गेअरवर सुसाट वेगात भर रस्त्यावरून उलट्या दिशेने जात आहे. या पीक अपचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. भरधाव वेगात उलट्या दिशेने धावणाऱ्या या गाडीत ड्रायव्हर कसा नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे पुण्यात आपघात वाढले असतांना या गाडीमुळे देखील मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. सुदैवाने या घटनेत तसे काही झाले नाही. हडपसरमध्ये ज्या रस्त्यावर ही घटना घडली तो रस्ता मोठ्या वर्दळीचा आहे. ही गाडी मागे धावत असतांना स्त्यांवर अनेक वाहने देखील होती. गाडीचा वेग मोठा असल्याने मोठा अपघातात होण्याची शक्यता होती. या घटनेमुळे अनेकांनी रोष व्यक्त केला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील पीकअप गाडी ही पुणे मनपाची असल्याचे पुढे आले आहे. ही गाडी पालिकेच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्तीची गाडी आहे. रस्त्यांवर हा प्रकार घडला असला तरी रात्रीची वेळ असल्याने रस्ता रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना रविवारी रात्री घडली.
या प्रकरणी तक्रार दिल्यावर हडपसर पोलिसांनी चलकावर गुन्हा दाखलकेला आहे. श्रावण वाघमारे असे गुन्हा दाखल झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. हा प्रकार रामटेकडी उड्डाणपुलावर ३ ऑगस्ट रोजी रात्री ११. ३५ मिनिटांनी घडला, पोलीस शिपाई उमेश मच्छिंद्र शेलार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या अंतर्गत रामटेकडी उड्डाणपुलावर रविवारी रात्री डिव्हायर दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामाच्या ठिकाणी चालक श्रावण वाघमारे याने रामटेकडी उड्डाणपुलावर वाहन पार्क करताना हॅन्डब्रेक लावला नव्हता. ही गाडी उतारावर असल्याने पिकअप व्हॅन उतारावर वेगाने रिव्हर्स जाऊ लागली. ही पीकअप भरधाव वेगात ५०० मीटर उलट्या दिशेने जाऊन डिव्हायडरला धडकून थांबली.