मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच व्यासपीठावर, पुण्यातील कार्यक्रमात एकत्र येणार

Pune: शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच व्यासपीठावर, पुण्यातील कार्यक्रमात एकत्र येणार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 21, 2023 07:50 AM IST

Sharad Pawar and Eknath Shinde: पुण्याच्या मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अनेक प्रमुख पाहुणे हजेरी लावणार आहेत.

Eknath Shinde and Sharad Pawar
Eknath Shinde and Sharad Pawar

Vasantdada Sugar Institute 46th Annual Meeting: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. पुण्यातील मांजरी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत दोघे नेते एकत्र येणार असल्याने ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी सकाळी ११ वाजता संस्थेच्या मांजरी बुद्रुक येथील कार्यालयात होणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहेत. या सभेत राजकीय नेत्यांसोबत संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच साखर उद्योगातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत शास्त्रीय, तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधन करण्याकरिता या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची स्थापना 19 नोव्हेंबर 1975 रोजी दिवंगत वसंतदादा पाटील यांनी केली आहे. 1956-57 मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. 

WhatsApp channel