पुण्यातून कोकणात जाण्यासाठी महत्वाचा मार्ग असलेला वरंधा घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंधा घाट सर्व वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आली आहे. ३० मे रोजीच हा मार्गावरील वाहतूक सुरू झाली होती. त्यानंतर हा घाट आजपासून (२६ जून) बंद करण्यात आला आहे. पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे संभाव्या अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पुण्यातून कोकणात जाणारे अनेक नागरिक या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर अपघात होऊ नये या साठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून भोर-महाड मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट बंद करण्यातत आला आहे. हवामान विभागाकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येत असताना हलक्या वाहनांसह घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून घाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन इतर वेळी हलक्या वाहनांची वाहतुक सुरु ठेवण्यात आली होती. मात्र आजपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वरंधा घाट बंद करण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत बंद राहणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
या घाटातील रस्ता हा नागमोडी वळणाचा असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यावरुन कोकणात जाण्यासाठी वरंधा घाट जवळचा मार्ग आहे. मात्र हा शॉर्टकट मार्ग बंद झाल्याने वाहनधारकांना आता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. वाहनधारकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे आणि पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर असा मार्ग आहे.