मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune university Exam : महाराष्ट्रात सरकारी सुट्टी अन् पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Pune university Exam : महाराष्ट्रात सरकारी सुट्टी अन् पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 19, 2024 08:55 PM IST

Pune University Exam Postponed : राज्य सरकारने राम मंदिर उद्घाटनाची सुट्टी जाहीर केल्यानेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला २२ जानेवारीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.

Pune University Exam Postponed
Pune University Exam Postponed

अयोध्येतील राम मंदिराचे सोमवारी (२२ जानेवारी) उद्घाटन करण्यात येणार आहे. यादिवशी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर राज्य सरकारनेही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याचा परिणाम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षांवर झाला आहे. 

राज्य सरकारने राम मंदिर उद्घाटनाची सुट्टी जाहीर केल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला २२ जानेवारीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रक प्रसिद्ध करत याबाबत माहिती दिली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार त्या दिवशी आयोजित परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. २२ जानेवारी रोजीच्या परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार, हे नंतर कळवण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे भव्य लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मंदिर ट्रस्टतर्फे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक दृकश्राव्य माध्यमातून हा सोहळा पाहू शकणार आहेत. केंद्र सरकारने सोमवारी अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली आहे. त्यानंतर आता राज्य सरकारनेही सुटी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

WhatsApp channel