Pune ngar road : जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुण्यात १ जानेवारीला नगर रस्त्यावर वाहतूक बंद;जाणून घ्या पर्याय मार्ग-pune traffice road diverted on 31st dec to 1 january in city for koregaon bhima vijay stambh abhivadan diwas ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune ngar road : जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुण्यात १ जानेवारीला नगर रस्त्यावर वाहतूक बंद;जाणून घ्या पर्याय मार्ग

Pune ngar road : जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुण्यात १ जानेवारीला नगर रस्त्यावर वाहतूक बंद;जाणून घ्या पर्याय मार्ग

Dec 30, 2023 05:56 AM IST

koregaon bhima vijay stambh shaurya diwas traffic change news: पुण्यात १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, पुणे नगर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात अलायी आहे.

Pune Traffic change for new year
Pune Traffic change for new year

koregaon bhima vijay stambh shaurya diwas traffic change news: पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२४ रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त होणारी गर्दी पाहता पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. रविवारी (दि ३१) दुपारी २ पासून ते १ जानेवारी रोजी या मार्गावर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करण्या एवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik MIDC : सिन्नर एमआयडीसीतील काच कारखान्यात भीषण आग, बॉयलरचा स्फोट

विजय स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी या सोहळ्यासाठी येणार आहेत. त्यामुळे या मार्गवारील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदलाबाबतचे फलक जागोजागी लावले जाणार आहे, त्यानुसार वाहन चालकांनी प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

अशी असेल वाहतूक व्यवस्था

नगर रस्त्यावरील वाहतूक १ जानेवारी २०२४ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरुन वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरुन विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड,मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे नगरकडे जावे.

OMG! घरात एकाच कुटूंबातील ५ लोकांचे सांगाडे आढळल्याने खळबळ, २०१९ पासून बंद होता दरवाजा

तर कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरुकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरुन केवळ अनुनायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जडवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

जयस्थंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुनायांसाठी प्रशासनाने वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहेत. वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे- लोणीकंद येथील आपले घर, बौद्ध वस्ती, मोनिका हाॅटेलशेजारी, ओमसाई हॉटेलच्या पाठीमागे, तुळापूर फाटा स्टफ कंपनीशेजारी, राजेशाही मिसळ हॉटेलच्या मागे, तुळापूर रस्ता वाय पॉईंट, हॉटेल शेतकरी मिसळजवळ, तुळापूर फाटा हॉटेल रॉयल शेजारी, फुलगाव सैनिकी शाळा मैदान, सोमवंशी ॲकडमी, थेऊर रस्ता, खंडोबाचा माळ, पेरणे फाटा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा.

पर्यायी मार्ग :

१. शिक्रापुर ते चाकण व चाकण ते शिक्रापुर अशी जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

२. अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जड अवजड व इतर वाहने ही शिरुर-न्हावरा फाटा, न्हावस-पारगाव-केडगाव चौफुला-यवत-सोलापूर रोड हडपसर या मार्गे पुणेकडे येतील.

३. पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड अवजड व इतर वाहने ही पुणे-खराडी-हडपसर- सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला पारगाव-न्हावरा शिरुर मार्ग अहमदनगर रोड अशी जातील.

४ . मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड़ अवजड व माल वाहतुक (ट्रक टेम्पो इ.) ही वाहने वडगाव मावळ-तळेगाव-वाकण-खेड-नारायणगाव-आळेफाटा मार्ग अहमदनगर अशी जातील.

५. मुंबई व ठाणेकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार, जीप इत्यादी ही बडगाव मावळ-तळेगाव-चाकण-खेड-पाबळ शिरूर मार्गे अहमदनगर अशी जातील.

---------------------------------

Whats_app_banner
विभाग