Pune sadhu vasvani rout traffic update : पुण्यातील साधुवासवानी पुल हा धोकादायक झाला आहे. या मुळे हा पूल पाडण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. या दरम्यान, या मार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. साधुवासवानी पुल पाडुन तो पुन्हा नव्याने बांधुन पुर्ण होईपर्यंत कोरेगांव पार्क, बंडगार्डन वाहतूक विभागाचे हद्दीमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने हा वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवार पासून या भागातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला असून नागरिकांनी याची दखल घेऊन प्रवास करावा असे आवाहन वाहतूक आयुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
पर्णकुटी चौक ते ब्ल्यु डायमंड चौक ते मोबोज चौक असा एकेरी मार्ग करण्यात आला आहे.
मोबाज चौक ते महात्मा गांधी उद्यान चौक (बंडगार्डन रोड) असा एकेरी मार्ग करण्यात आला असून अलंकार चौक ते आय. बी. चौक ते सर्कीट हाऊस चौक ते मोरओढा चौक असा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. मोर ओढा चौक ते कौन्सिल हॉल चौक असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे.
वरील सर्व मार्गावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळुन सर्व प्रकारच्या जड, अवजड, मल्टीअॅक्सल वाहनांना २४ तास बंदी करण्यात येत आहे. काहुन रोड जंक्शन ते तारापुर रोड जंक्शन हा रस्ता पूर्वी प्रमाणेच एकेरी मार्ग राहील. कॉन्सील हॉल चौक ते साधु वासवानी पुतळा मार्ग एकेरी करण्यात येत आहे.
नगर रोडवरुन मोर ओढा चौकाकडे जाणारी वाहने पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, ब्ल्यू डायमंड चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास रोडने मोबोज चौक, डावीकडे वळण घेवून मंगलदास चौकी समोरुन पुन्हा डावीकडे वळण घेवून आय.बी. (रेसीडेन्सी क्लब) चौक, डावीकडे वळण घेवून सर्किट हाऊस चौक मार्गे मोर ओढा चौक मार्गे मार्गस्त होतील.
मोर ओढा चौक कोरेगांव पार्ककडे जाणारी वाहने मोर ओढा चौक, सरळ कौन्सिल हॉल चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास चौक, उजवीकडे वळण घेवून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळण घेवून कोरेगांव पार्क येथून पुढे जातील.
पुणे स्टेशन येथुन कोरेगांव पार्ककडे जाणारी वाहने पुणे स्टेशन, अलंकार चौक, डावीकडे वळण घेवून जहाँगीर चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास चौक, पुणे स्टेशन, अलंकार चौक, सरळ आय.बी. चौक, डावीकडे वळण घेवून मंगलदास चौक, उजवीकडे वळण घेवून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळण घेवून कोरेगांव पार्क येथे पुढे जातील.
पुणे स्टेशन ते घोरपडीकडे जाणारी वाहने पुणे स्टेशन से अलंकार चौक, सरळ आय.बी. चौक, सरळ सर्कीट हाऊस चौक मार्गे मोरओढा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
घोरपडी व भैरोबानाला चौकामधुन येणाऱ्या सर्व बसेस (पी.एम.पी.एम.एल. सह) मोरओढा चौकाकडुन सरळ जावून काहुन रोड जंक्शन वरून डावीकडे वळण घेवून तारापूर रोड जंक्शन वर येतील व उजवीकडे वळण घेवून तारापूर रोडने ब्लु नाईल चौकाकडुन उजवीकडे वळण घेवून कॉन्सील हॉल चौकामधुन इच्छितस्थळी जातील. आय.बी. जंक्शन ते मोरओढा हा एकेरी मार्ग आवश्यक त्यावेळेस तात्पुरता दुहेरी करण्यात येईल. तर ब्लू डायमंड चौक ते साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क कडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे राहील.