मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  pune crime : दंड आकरल्याने वाहतूक पोलिसाला चौघांनी केली मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना
Crime News
Crime News (HT_PRINT)

pune crime : दंड आकरल्याने वाहतूक पोलिसाला चौघांनी केली मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना

19 August 2022, 15:38 ISTNinad Vijayrao Deshmukh

Pune traffic police beaten up पुण्यात एका वाहतूक पोलिसाने दंड मागितला म्हणून त्याला विनय भंगाची केस दाखल करण्याची धमकी देत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : विरुद्ध दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या महिलेवर कारवाई करणाऱ्या पोलिसावर विनयभंगाची तक्रार करण्याची धमकी देत वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार टिळक चौकात उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी महिला आणि तिच्या पतीवर विश्रामबाग पोलिस चौकीत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या प्रकरणी सृष्टी राऊत, प्रेम राऊत, रोहन बाबासाहेब जावळे आणि शशिकला राऊत (सर्व राहणार शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रेम राऊत आणि रोहन जावळे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी वाहतूक कर्मचारी संपत गुलाबराव करवंदे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केळकर रस्ता ते टिळक चौक हा मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आला आहे. या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी संपत करवंदे हे तैनात होते. यावेळी आरोपी महिला सृष्टी राऊत ही तिच्या दुचाकीवरुन टिळक चौकाच्या दिशेने येत होत्या. त्यांनी वाहतूक नियमांची पायमल्ली केली. हे करवंदे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांना अडवले आणि ऑनलाईन दंड आकरला. यावरून सृष्टी राऊत यांना राग आला. त्यांनी करवंदे यांच्याशी वाद घातला. तसेच बघून घेण्याची धमकी दिली आणि निघून गेल्या. पुन्हा काही वेळानंतर पती, भाऊ आणि आजी या तिघांना घेऊन त्या आल्या आणि करवंदे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. चौघांनीही करवंदे यांना मारहाण केली. तसेच तक्रार केल्यास विनयभंग केल्याची खोटी तक्रार करण्याचे धमकावले. या घटनेनंतर वाहतूक पोलिस कर्मचारी संपत गुलाबराव करवंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, प्रेम यशवंत राऊत, रोहन बाबासाहेब जावळे यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले.

 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग