Pune Traffic change : पुण्यात मेट्रोची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरच्या बांधकाम हाती घेण्यात आल्याने सिमला ऑफिस चौकाजवळील वाहतुकीत आज पासून मोठा बदल करण्यात आला आहे. या चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. जाऊन घेऊयात कोणत्या मार्गावर प्रवेश बंद राहील आणि कुठून मार्ग बदलले आहेत.
वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या महितीनुसार सिमला ऑफिस चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एसटी. स्टँड मार्ग) सर्व वाहनांसाठी वाहतूक ही एकेरी मार्ग करण्यात येत आहे. वीर चाफेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
वीर चाफेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूकडील सेवा रस्त्यावरून चाफेकर चौक डावीकडे वळून न.ता. वाडी - उजवीकडे वळण घेउन सिमला ऑफिस चौकाकडे वळवण्यात आली आहे. तर फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चाफेकर चौकातून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे.
चाफेकर चौक - सरळ न.ता. वाडी चौक उजवीकडे वळून सिमला ऑफिस चौक.- न. ता. वाडी चौक ते वीर चाफेकर चौक प्रवेश बंद राहील. न.ता.वाडी चौकातून डावीकडे वळून सरळ सिमला ऑफिस चौक- उजवीकडे वळून चाफेकर चौककडे जातील. स. गो. बर्वे चौकाकडून सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहील. वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व वाहनांना नो पार्किंग करण्यात येणार आहे.
सिमला ऑफिस चौकात मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत या चौकात वाहतूक बदल करण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
संबंधित बातम्या