Pune News: दिवाळी सणानिमित्त कपडे, दागिने, सजावटीच्या वस्तू आणि इतर अनेक गोष्टींची खरेदी करण्यासाठी पुण्यातील लोक शहराच्या मध्यवर्ती भागात जात आहेत. त्यामुळे परिसर गजबजून गेला आहे. याच पा्र्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
१) छत्रपती शिवाजी रस्त्यावर येणाऱ्या चारचाकी वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) वळून जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जावे
२) स्वारगेटकडून बाजीराव रस्त्यानं येणाऱ्या चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनांनी टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून डावीकडे वळून टिळक रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छित स्थळी जावं.
३) अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे वाहनचालकांनी बाजीराव रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जावं. तसंच फुटका बुरुज चौकातून जोगेश्वरी मंदिराकडे येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद केली जाणार आहे.
४) शनिवार चौकातून मंडईकडे जाणारी वाहतूक, कुमठेकर रस्त्यावरून मंडईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
पुण्यातील बाजीराव रोड, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, मंडईकडे येणाऱ्या दुकानदारांना बाबू गेनू पार्किंग, मिसाळ पार्किंग, हमालवाडा पार्किंग, साने पार्किंग या ठिकाणी वाहने पार्क करता येतील.
हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळी हा पाच दिवसांचा उत्सव, जो धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेला संपतो. प्राचीन हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी अमावस्येला साजरी केली जाते. २०२४ मध्ये दिवाळी (लक्ष्मी पूजन) १ नोव्हेंबर २०२४ रोजी पासून साजरी केली जाईल. दिवाळीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे.
संबंधित बातम्या