पुणे : पुण्यातील वैभवी गणेशोत्सव हा अवघ्या राज्यात प्रसिद्ध आहे. आज या लाडक्या गणरायचे स्वागत अवघी पुण्यनगरी करणार आहे. पुण्यातील मुख्य रस्त्यावर मिरवणुका काढून गणरायाचे स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत आज मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
- शिवाजीनगर येथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
- गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
- सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत.
- झाशी राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूल मार्गे कुंभारवेस जाणाऱ्या वाहन चालकांनी खुडे चौकातून मनपा पुणे समोरून मंगला चित्रपट गल्लीतून कुंभार वेस किंवा प्रिमियर गॅरेज चौक शिवाजी पुल मार्गे, गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभार वेस चौक.
- मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे.
- फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक
- आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
- सोन्यामारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
- मंगला चित्रपटगृहसमोरील प्रिमिअर गॅरेज गल्ली ते कुंभार वेस

|#+|
गणेशोत्सवादरम्यान घातपात टाळण्यासाठी तसेच हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या साठी तब्बल ७ हजार पोलिसांचा फौजफाटा पुण्यात तैनात करण्यात आला आहे. उत्सवादरम्यान शहर आणि उपनगरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सोबतच १८०० सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याची नजर देखील शहरावर राहणार आहे.