मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune traffic News : पुणेकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचा! मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल

Pune traffic News : पुणेकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचा! मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल

Mar 31, 2023 12:40 PM IST

Pune traffic news : पुण्यात मेट्रोची कामे वेगाने होत आहेत. नुकीतच शिवाजीनगर ते रुबि हॉल मेट्रोची चाचणी यशस्वी घेण्यात आली. शहरात लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यासाठी मेट्रो मार्गिकेच्या कामाचा वेग वाढवण्यात आला आहे. या कामामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Pune traffic news
Pune traffic news

पुणे : पुण्यात मेट्रोची कामे वेगाने होत आहेत. नुकीतच शिवाजीनगर ते रुबि हॉल मेट्रोची चाचणी यशस्वी घेण्यात आली. शहरात लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यासाठी मेट्रो मार्गिकेच्या कामाचा वेग वाढवण्यात आला आहे. दरम्यान, याच कामांमुळे येरवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूवरून नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या भागातील वाहतूक ही २१ एप्रिलपर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी या वाहतूक बदलांची दखल घेऊन प्रवास करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

येरवड्यातील डॉ. आंबेडकर पुलावरून तारकेश्वर मंदिरमार्गे वाहने नगर रस्त्याकडे जातात. मेट्रोच्या कामासाठी डॉ. आंबेडकर पुलावरून नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत दररोज रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. २१ एप्रिलपर्यंत दररोज रात्री या भागातील वाहतुकीत हा बदल केला जाणार आहे. दरम्यान, गरज भासल्यास डॉ. आंबेडकर पुलावरील वाहतूक बंद जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार म्हणाले. यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा असे देखील मगर म्हणाले.

असे असणार पर्यायी मार्ग

पुणे स्टेशनकडून येरवड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी मोबाज चौक, मंगलदास रस्ता, ब्ल्यू डायमंड हॉटेल चौक, कोरेगाव पार्क चौकातून जुन्या पुलावरून पर्णकुटी चौकाकडे जावे. पुणे स्टेशनकडून बोटक्लबकडे जाणाऱ्या वाहनांनी मोबाज चौक, डावीकडे वळून ढोले-पाटील रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

बोटक्लब रस्त्याने येरवड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी श्रीमान चौकातून अमृतलाल मेहता रस्त्याने कोरेगाव पार्क चौकातून इच्छितस्थळी जावे. येरवड्यातून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, कोरेगाव पार्क चौक, ब्ल्यू डायमंड हॉटेल चौकातून इच्छितस्थळी जावे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग