मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Traffic change : उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल; अशी असेल वाहतूक!

Pune Traffic change : उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल; अशी असेल वाहतूक!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 18, 2024 12:02 PM IST

Pune Traffic change : पुण्यात आज विभागीय आयुक्त कार्यालय (pune council hall) आणि जिल्हाधिकारी कार्यालयात (pune collector office) महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर तर महायुतीच्या सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार असल्याने आज पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल; अशी असणार वाहतूक! वाचा
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल; अशी असणार वाहतूक! वाचा

Pune Traffic change : पुण्यात आज राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभेसाठी विविध पक्षांचे उमेदवार आज विभागीय आयुक्त कार्यालय आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पूर्वी हे उमेदवार मोठे शक्ति प्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या बदलांची दखल घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Firing : माचिस मागितलं म्हणून एकावर गोळीबार! पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकातील घटना

पुण्यात आज महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे, पुण्यातून रवींद्र धंगेकर त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर महायुती कडून सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभमीवर आज पुण्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही नेते आज जोरदार शक्ति प्रदर्शन करणार आहेत. या साठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर महायुतीचा मेळावा आज होणार आहे. या साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस, अजित पवार उपस्थित राहणार असल्याने होणारी गर्दी पाहता वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

EPFO: मोठी बातमी! वैद्यकीय उपचारांसाठी आता पीएफमधून दुप्पट पैसे मिळणार, अर्ज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खात्यात जमा होणार

अशी असेल वाहतूक

विभागीय आयुक्त कार्यालय (कौन्सिल हॉल चैाक) ते ब्ल्यू नाईल हॉटेल रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले. आयबी चौकातून जाणारी वाहने ही कौन्सिल हॉल चौकातनू लष्कराच्या दक्षिण मुख्यालयमार्गे साधू वासवानी चौकाकडे वळवण्यात आली आहे. तर ब्ल्यू नाईल चौकातून आयबी चौकाकडे जाणारी वाहने ही किराड चौक, साधू वासवानी पुतळा मार्गे किंवा एसबीआय हाऊसमार्गे रेना रस्त्याने वळवण्यात आली आहे. लष्कराचे दक्षिण मुख्यालय ते साधू वासवानी चौकाकडे ये-जा करणारी वाहने आवश्यकतेनुसार काहून रस्ता चौकातून वळविण्यात येणार आहेत.

रास्ता पेठेतील शांताई हॉटेल चैाक आणि क्वार्टर गेट चैाकात सकाळी सहा ते दुपारी २ पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. वाहनचालकांना हे मार्ग टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. बॅनर्जी चौकातून क्वार्टर गेट चौकाकडे जाणारी वाहने पॉवर हाऊस चौकाकडे वळवण्यात आली आहे. तर क्वार्टर गेटकडून येणारी वाहने लष्कर भागातील बच्चू अड्डा आणि सरबतवाला चौकातून वळवण्यात आली आहे.

IPL_Entry_Point

विभाग