Pune Mumbai railway update : मुंबई, पुण्याला पावसाने गुरुवारी चांगलेच झोडपले. या पावसामुळे घाट विभागात दरडी कोसळल्या तर काही ठिकाणी झाडी कोसळली. या पावसाचा फटका गुरुवारी मुंबई, पुण्यादरम्यान रेल्वेसेवेलाही बसला. गुरुवारी य मार्गावर अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साठले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली होती. हवामान विभागाने मुंबई आणि पुण्याला आज देखील जोरदार पावसाचा अलर्ट दिला असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पुण्यादरम्यान धावण्याऱ्या अनेक गाड्या आज शुक्रवारी (दि २६ जुलै) रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे सेवेला गुरूवारी मोठा फटका बसला. या पावसामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मुळे प्रवाशांची गैरसोय झाली. आज पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या तीन गाड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत. बदलापूर-वांगणी दरम्यान लोहमार्गावर पाणी साचल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस व पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस या तीन गाड्या रद्द केल्या आहेत.
आज शुक्रवारी जोरदार पावसाच्या शक्यतेने पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी या रद्द केलेल्या गाड्यांची दखल घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या सोबतच प्रवाशांना माहिती देण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रेल्वेचे कर्मचारी प्रवाशांना माहिती देत आहेत.
वाठार ते पळशी दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ४७ येथे देखभाल दुरुस्तीची कामे हटी घेण्यात आल्याने येथील क्रॉसिंग हे बंद राहणार आहे. पुणे विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील वाठार-पिंपोड-दहिगाव-देऊर, वाठार-दहिगाव- देऊर आणि वाठार-तळीये-बिचकाळे-गुजरवाडी-पळशी या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. नागरिकांनी हे बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या