Daund news : विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानं पुण्यात शिक्षकाची आत्महत्या; दौंडमध्ये खळबळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Daund news : विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानं पुण्यात शिक्षकाची आत्महत्या; दौंडमध्ये खळबळ

Daund news : विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानं पुण्यात शिक्षकाची आत्महत्या; दौंडमध्ये खळबळ

Aug 10, 2023 09:22 AM IST

Pune Daund teacher Suicide news : पुण्यातील दौंड तालुक्यात एका शिक्षकाने विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Daund teacher news
Pune Daund teacher news

पुणे : पुण्यात दौंड तालुक्यातील बुवाची वाडी येथील शिक्षकाने शाळेतील विद्यार्थी सोडून गेल्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीतून ही बाब पुढे आली आहे.

मणिपूर पेटण्याचं कारण काय? हिंसाचार रोखण्यासाठी सरकारनं काय केलं? अखेर अमित शहांनी लोकसभेत सांगितलं

शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करत असतात. अनेक शिक्षक तळमळीने आपले विद्यार्थी पुढे जावे यासाठी झटत असतात. पुण्यातील दौंड तालुक्यातील बुवाची वाडी येथील जिल्हा परिषदेचा एक शिक्षक देखील आपल्या विद्यार्थ्यांना असाच पोटतिडकीने शिकवत होता. मात्र, विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने त्याने आत्महत्या केली.

अरविंद देवकर असे या शिक्षकांचे नाव असून त्याची दोन महिन्यांपूर्वी बुवाची वाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर बदली झाली होती. मात्र, येथील शाळा ही खराब असल्याने त्यांनी शाळेची दुरवस्था पाहून ती शाळा व्यवस्थित करण्याचे ठरवले. या साठी विद्यार्थ्यांना देखील त्यांनी सोबत घेण्याचे ठरवले. दरम्यान, छोट्याश्या शाळेची स्वच्छ करून घेण्यासाठी आणि स्वयंशिस्तीचे शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना विश्वासात घेत त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदानाचा हेतु मुलांना समजावा असा उदात्त हेतु ठेऊन त्यांनी ही कृती केली, मात्र, मुलांच्या पालकांना ही बाब पटली नाही. त्यांनी शाळेत येऊन दरेकर यांच्याशी वाद घालत गोंधळ घातला. त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या शाळेतून काढून टाकत दुसऱ्या शाळेत घातले. ही बाब अरविंद देवकर यांच्या मनाला लागली. चांगलं करण्याच्या हेतूने केलेल्या कृतीमुळे सर्वच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने ते नैराश्यात गेले. त्यांनी विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केली. चिठ्ठीत त्यांनी या बाबतचा खुलासा केला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर