मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ३५ टक्के जिंदाबाद! काठावर पास झाल्यानंतर म्हणाला, ‘मी अभ्यास केलेला’
३५ टक्के गुण मिळवल्याचा आनंद मित्रांसोबत साजरा करताना शुभम
३५ टक्के गुण मिळवल्याचा आनंद मित्रांसोबत साजरा करताना शुभम
17 June 2022, 16:37 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
17 June 2022, 16:37 IST
  • आज दहावीचा निकाल लागला. पुणे विभागाचा निकाल ९६.९६ टक्के लागला. या निकालात मुलींनी बाजी मारली. अनेकांनी चांगले गुण मिळवले. पण, पुण्यातील एका पठ्यानं एक गुणांचा एक वेगळाच विक्रम केला आहे. या पठ्यानं सर्व विषयात ३५ टक्के गुण मिळवत एकुण ३५ टक्क्यांनी पास झाला आहे. त्यानं चांगला अभ्यास केला पण त्याला ३५ टक्केच पडले. असे असले तरी आपण आनंदी असल्याचे त्याच म्हणण आहे.

Pune SSC result: पुण्यात आज दहावीच्या निकालाच्या जल्लोषात विद्यार्थी आहेत. ब-याच विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तर काहींनी सहज ९० ते ९५ टक्के मिळवले आहेत. मात्र, पुण्यात एका पठ्यानं मात्र, वेगळाच विक्रम केला आहे. तुम्ही म्हणाल १० वीच्या परीक्षेत विक्रम कसं काय शक्य आहे? पण त्यान हे शक्य करून दाखवले आहे. या पोरानं चक्क सर्व विषयांत ३५ गुण मिळवले आहे. एवढेच नाही तर ३५ टक्के घेऊन तो पासही झाला आहे.(Pune Student got 35 marks in all subject) ‘मी खूप अभ्यास केला होता. चांगले मार्क पडतील अशी अपेक्षा होती. पण, मार्क मिळाले नाही. असे असले तरी मी माझ्या निकालावर खुश आहे', असं त्याच म्हणण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शुभम जाधव असे या ‘मार्क वीरा’चे नाव असून तो पुण्यातील गंजपेठेत राहायला आहे. शुभमची घरची परिस्थीती तशी बेताची आहे. वडील कंपनीत कामाला आहेत. तर आई धुणी भांडी करते. शुभमला ९ वीत ६० टक्के मिळाले. १० वीतही चांगले मार्क मिळवण्यासाठी शुभमने रांत्रदिवस अभ्यास केला. त्याला चांगल्या मार्कांची अपेक्षा होती. शुक्रवारी सकाळी जेव्हा निकाल लागला, तेव्हा त्याला आश्चर्याचा जणू धक्काच बसला. त्याला एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क सर्व विषयांत ३५ गुण मिळाले. तसेच ३५ टक्के घेऊन उत्तीर्णही तो झाला. सुरवातीला त्याला कमी गुण मिळाल्यामुळे दुख: झाले. पण, पास झाल्याचा आनंदही त्याला होता.

त्याच्या या मार्कांबद्दल त्याला विचारले असता शुभम म्हणाला, मी चांगला अभ्यास केला. रोज मी रात्र जागून अभ्यास करायचो. त्यामुळे मला चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा होती. पण, फक्त ३५ टक्केच मिळाले. मार्क कमी असल्याचे दुख: आहेच पण पास झाल्याचा आनंदही आहे असे शुभम म्हणाला.

<p>Shubham Marksheet&nbsp;</p>
Shubham Marksheet&nbsp;

या मार्कांच्या जोरावर तुला काय व्हायचे आहे असे विचारल्यावर शुभम म्हणाला, मला कॉमर्सला जायचे आहे. भविष्यात काय बनायचे असे काही निश्चित नाही. पण पोलिस बनायला मला आवडेल असे शुभम म्हणाला. त्या दृष्टीने तयारी करेन असा दृढविश्वासही त्याने दाखवला.

१२ वीत चांगले गुण मिळवणारच

दहावीत ३५ टक्के मिळवून शुभम खचला नाही. त्याने १२वीत चांगले मार्क मिळवण्याचा दृढनिश्चय केला आहे. आता मार्क जरी कमी मिळाले असले तरी मी पुन्हा चांगला अभ्यास करीन आणि १२ वीत खूप चांगले मार्क मिळवीन असा विश्वास त्यानं व्यक्त केला आहे. शुभमच्या मित्रांनाही त्याने कमावलेल्या गुणांचा सार्थ अभिमान आहे.

एकीकडे गुण कमी मिळाल्याने मुले हताश होऊन टोकाचे पाऊल ऊचलतात. त्यांच्यासाठी शुभमचे उदहारण महत्वाचे आहे. ३५ टक्के मार्क मिळाले असले तरी त्याचा आत्मविश्वास मात्र कायम आहे. आता जरी गुण कमी मिळाले असले तरी भविष्यात मात्र, चांगले गुण मिळवत पोलिस बनायचा त्याचा निर्धार कौतूक करण्याजोगा आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग