HSC Exam copy cases : राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेला बुधवार (दि २१) पासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेत कॉपी आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी तब्बल २७१ भरारी पथके स्थापन करण्यात आले आहे. मात्र, असे असतांना राज्यभरात अनेक कॉपीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. विविध ठिकाणी तब्बल ५८ कॉपी प्रकारने उघडकीस असून त्यांच्यावर बोर्डाच्या नियमाप्रमाणे कारवाई होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि लातूर विभागीय मंडळात सर्वाधिक घटना घडल्या. तर पुणे विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर १५ कॉपी प्रकरणे नोंदवल्या गेली.
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहेत. मंडळातर्फे राज्यभरात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. डमी विद्यार्थी आणि कॉपी प्रकार रोखण्यासाठी राज्य भरातील परीक्षा केंद्र आणि शाळांना खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असे असतांना पहिल्याच दिवशी कॉपीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार इंग्रजी विषयात छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर सर्वाधिक २६ कॉपी प्रकरणांची नोंद झाली. त्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभागीय मंडळ असून यात १५ प्रकरणे उघडकीस आली. तर लातूर विभागीय मंडळात १४, नाशिक ०२ आणि नागपूर मंडळात १ अशा एकूण ५८ घटनांची नोंद झाली आहे.
मुंबई, कोल्हापूर, अमरावती आणि कोकण विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर एकही कॉपीचा प्रकार घडला नाही, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी. दरम्यान, कॉपी करणाऱ्यांवर बोर्डाच्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. पुढील काही वर्ष त्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. तर काही प्रकरणात फौजदारी कारवाई देखील केली जाऊ शकते.