Pune yerwada Crime : पुण्यात येरवडा येथे एका पोटच्या मुलाने आपल्या आईचा किरकोळ कारणावरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी मुलाला दारूचे व्यसन असून आईने त्याला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून त्याने लाकडी दांडक्याने तिला गंभीर मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी मुलगा आणि नातवा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ मे रोजी उघडकीस आली असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
मंगल मोहन नेटके (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मयूर मोहन नेटके (रा.येरवडा) आणि अल्पवयीन नातवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगल नेटके यांची भाची संध्या अरुण वाघमारे (वय ५०) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल नेटके हे त्यांच्या मुलगा मयूर यांच्या सोबत येरवडा येथे राहण्यास आहे. मयूर याला दारूचे व्यसन असून त्याने मंगल यांना दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, मंगल यांनी त्यांना दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही. याचा राग आल्याने मयूर आणि अल्पवयीने नातवाने मंगल यांना दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मंगल या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने त्यांच्या नातेवाइकांनी ससून रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मंगल यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मुलाला आणि नातवाला अटक केली आहे.
हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेत अज्ञाताने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा खून केला. राजेंद्र रामभाऊ शेजुळ (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भाग्यश्री राजेंद्र शेजुळ (वय २९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
संबंधित बातम्या