Pune Aund Crime : पुण्यातील औंध परिसरातील एका सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला समोसा म्हणून चिडवल्याने संतापलेल्या वडिलांनी ९ वर्षांच्या मुलाच्या जोरदार कानशिलात लागावली. या मुळे मुलगा जागेवरच बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात नेले असता त्याच्या कानाच्या पडद्याला आणि जबड्याला सूज आल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांना देखील मुलीच्या वडिलांनी शिवीगाळ केली असून या प्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १५ ऑगस्टला पुण्याच्या औंध भागातल्या एका सोसायटीत दुपारी १२ च्या सुमारास घडली. या सोसायटीमध्ये स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम सुरू असताना मुलांना खाऊचे वाटप करण्यात येत होते. यावेळी लहान मुलांची मस्ती देखील सुरू होती. काही मुळे एकमेकांना चिडवत मस्ती करत होती. याच वेळी एका मुलाने समोसा खात असतांना सोसायटीतील एका मुलीला समोसा म्हणत चिडवले. यानंतर त्याने मुलीला ओरबडले देखील व तिच्या बाजूने कचरापेटी फेकली.
ही संपूर्ण बाब मुलीच्या वडिलांनी पहिली. त्यांनी कसलाही विचारंन करता मुलाच्या उजव्या कानाखाली थापड मारली. यानंतर मुलगा खाली पडून बेशुद्ध झालं. थोड्या वेळानंतर मुलाला शुद्ध आली व यानंतर टु तो घरी रडत गेला. त्याच्या आई वडिलांनी त्याला काय झाले विचारले असता, त्याने सर्व काही सांगितलं. यानंतर मुलाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलांना जाब विचारला. यानंतर त्यांनी तुमच्या मुलाने माझ्या मुलीला समोसा चिडवत तिच्यावर कचरा पेटी फेकल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्या मारल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुलाचा गाल सुजला असल्याने त्याला दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी मुलाच्या कानाच्या पडद्याला व जबड्याला सूज आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे मुलाच्या वडिलांनी थेट चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात जात मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वारजे भागात रामनगर परिसरात असलेल्या खाणीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दक्ष सुशांत कांबळे (वय १३, रा. रामनगर, वारजे ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. दक्ष हा मित्रांसोबत गुरुवारी (दि १५ ) दुपारी खाणीत साचलेल्या पाण्यात पोहायला गेला होता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्याबरोबर असलेल्या मित्र घाबरले. त्यांनी या घटनेची माहिती कोणाला दिली नाही. दक्ष घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी मित्रांकडे चौकशी केली. तेव्हा दक्ष खाणीत बुडाल्याचे समजले.