मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

May 17, 2024 09:33 PM IST

Pune Shocking News: पुण्यातील वाकड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या गुप्तांगावर कुलूप लावले.

पुण्यात चारित्र्याच्या संशायावरून पत्नीच्या गुप्तांगावर कुलूप लावल्याप्रकरणी २६ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.
पुण्यात चारित्र्याच्या संशायावरून पत्नीच्या गुप्तांगावर कुलूप लावल्याप्रकरणी २६ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.

Pune Crime: पिंपरी चिंडवडमधील वाकड येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली. चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, उपेंद्र हुडके असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मूळचा नेपाळमधील बाचकुट या गावातील रहिवाशी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो पत्नीसह पुण्यातील वाकड येथे वास्तव्यास होता. परंतु, उपेंद्र त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात वारंवार भांडण होत असे. दरम्यान, ११ मे २०२४ रोजी हुडके दाम्पत्यांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. मात्र, यावेळी उपेंद्रने कहरच केला. त्याने पत्नीला मारहाण करत तिच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला खिळे ठोकले आणि कुलूप लावले. यात त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाकड पोलिसांनी रुग्णालयात महिलेचा जबाब नोंदवला.

महिलेची प्रकृती स्थिर

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी उपेंद्र हुडके याच्याविरुद्ध भादवी ३२६, ५०६ आणि ३२३ नुसार गुन्हे दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या गुप्तांगावर कुलूप लावल्यानंतर आरोपीने चावी कुठे तरी फेकून दिली. कुलूपाची चावी नसल्याने डॉक्टरांना काढता येत नव्हते. कुलपाच्या कड्या कापून ते काढण्यात आले. या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या प्रकरणानंतर पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

पुणे: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईची हत्या

पुण्यात येरवडा येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने जन्मदात्या आईची हत्या केली. ही घटना १५ मे २०२४ रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाला दारूचे व्यसन होते. दारून पिण्यासाठी त्याने आईकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्याच्या आईने नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या मुलाने लाकडी दांडक्याने आईला मारहाण केली. या घटनेत आई गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग