Pune Rape: पुण्यात गुन्हगारीचे प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात गेल्या काही दिवासांपासून हत्या, बलात्कार, प्राणघातक हल्ला आणि चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवीर पुण्या उंड्री परिसरात तरूणीच्या नाका- तोंडात गांजाचा धूर सोडून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरूणीने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण राजेंद्र अंकुशे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित तरुणीचे प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपीचे अन्य काही मुलींसोबत संबंध असल्याचे समजतात पीडिताने त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडून टाकले. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी पीडिताच्या घरी गेला आणि तिला गांजा पिण्यासाठी जबरदस्ती केली. परंतु, पीडिताने नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने पीडिताला मारहाण करण्यास सुरुवात केली.तसेच पीडिताचे हात पाय बांधून तिच्या नाका- तोंडात गांजाचा धूर सोडला. ज्यामुळे पीडिताला गुंगी आली. शुद्धीत आल्यानंतर पिडिताला आपल्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आले.
यानंतर पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार कोंढवा पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी देखील डोके वर काढत असून त्याला आळा घालणे गरजेचे असल्याचे पाहायला मिळत आहे.
लग्नाचे आमिष दाखवत विवाहित महिलेवर अत्याचार
गुजरातमध्ये लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहित महिलेवर वर्षभर लैंगिक संबंध ठेवल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. ही घटना अहमदाबादमधील पालडी येथे घडली आहे.याबाबत पीडितेने पोलिसांत तक्रार केली आहे. महिलेने आपल्या म्हटले आहे की, मुलाच्या मित्राने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा शरीरसंबंध ठेवले.
संबंधित बातम्या