Viral News : पुणे-सोलापूर हायवेवर थरकाप उडवणारी घटना! जेवण दिलं नाही म्हणून हॉटेलमध्ये ट्रक घुसवला-pune shocker truck driver rams truck into hotel after owner denied food ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral News : पुणे-सोलापूर हायवेवर थरकाप उडवणारी घटना! जेवण दिलं नाही म्हणून हॉटेलमध्ये ट्रक घुसवला

Viral News : पुणे-सोलापूर हायवेवर थरकाप उडवणारी घटना! जेवण दिलं नाही म्हणून हॉटेलमध्ये ट्रक घुसवला

Sep 07, 2024 03:30 PM IST

Indapur Truck Viral News : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे जेवण न मिळाल्याने एका ड्रायव्हरने ट्रक हॉटेलमध्ये प्रवेश केला. यामुळे हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Shocking Truck Driver Denied Food by owner Rams Truck into Hotel in Pune
Shocking Truck Driver Denied Food by owner Rams Truck into Hotel in Pune

Pune Solapur Highway Truck driver news : गुन्हेगारीच्या घटनांमुळं गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या पुणे शहरात आणखी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. हॉटेल मालकानं जेवण देण्यास नकार दिल्यानं एका व्यक्तीनं ट्रक हॉटेलमध्ये घुसवल्याची घटना घडली आहे. यात हॉटेलसह पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव इथं शुक्रवारी रात्री ही घटना घडली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चालक भरधाव वेगानं ट्रकसह हॉटेलच्या गेटला वारंवार धडका देत असल्याचं त्यात दिसत आहे. त्याला थांबवण्यासाठी आजूबाजूचे लोक ट्रकच्या केबिनवर दगड मारतात. मात्र, ड्रायव्हरला काहीच फरक पडत नसल्याचंही दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक सोलापूरहून पुण्याकडे जात होता. जेवणासाठी त्यानं पुणे-सोलापूर मार्गावरील हिंगणगावातील गोकुळ हॉटेलच्या बाहेर ट्रक थांबवला. ट्रक थांबवून तो हॉटेलच्या आत गेला आणि जेवण मागायला गेला. मात्र, किचन बंद झालं असल्यानं आता जेवण मिळणार नाही असं मालकानं त्याला सांगितलं. त्यामुळं त्याचा संताप अनावर झाला. 

त्या रागातच तो परत आपल्या ट्रककडे गेला आणि ट्रक सुरू केला. सुरुवातीला हॉटेलच्या आवारातील दोन गाड्यांना त्यानं धडक दिली व नंतर ट्रक प्रवेशद्वारावर धडकवला. ट्रक मागे-पुढे घेऊन तो सतत गेटला धडका मारत होता. ट्रक चालकाला असं करताना पाहून आजूबाजूचे लोक त्याच्या दिशेनं धावले. बाहेरून आरडाओरडा करून लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो थांबला नाही. ट्रकच्या धडकेत हॉटेलच्या गेटचा भागही तुटला.

ट्रकचालकाला रोखण्यासाठी शेवटी काही लोकांनी ट्रकवर दगडफेक केली. तरीही ट्रक ड्रायव्हर थांबत नव्हता. शेवटी काही वेळानंतर त्यानं ट्रक थांबवला. त्यानंतर तिथं जमलेल्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं. तोपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. लोकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं. सुदैवानं या सगळ्या प्रकारात कुणीही जखमी झालं नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Whats_app_banner
विभाग