Pune Gangrape : मुंबईतील तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार; मैत्रिणीने घरी बोलावून केला घात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Gangrape : मुंबईतील तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार; मैत्रिणीने घरी बोलावून केला घात

Pune Gangrape : मुंबईतील तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार; मैत्रिणीने घरी बोलावून केला घात

Jan 07, 2025 11:46 AM IST

Mumbai Woman Gangraped At Pune: मुंबईहून पुण्याला आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पीडिताच्या मैत्रिणीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे: मुंबईतील तरुणीवर सामूहिक बलात्कार
पुणे: मुंबईतील तरुणीवर सामूहिक बलात्कार

Pune Gangrape News: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. याप्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणाच्या एका मैत्रिणीसह दोन जणांना अटक केली आहे. तर, अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे. ही घटना शुक्रवारी (३ जानेवारी २०२४) घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रोहिदास गव्हाणे (वय, २८) आणि सुमोना भरत गव्हाणे उर्फ ​​सुमोना नूर इस्लाम शेख (वय, २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही पुण्यातील सिंहगड रोड येथील वडगाव येथील रहिवासी आहेत. पीडित तरुणी मुंबईतील रहिवासी असून आरोपी सुमोना तिची मैत्रिण आहे. दरम्यान, शुक्रवारी सुमोनाने पीडिताला नवले पुलाजवळील आपल्या राहत्या घरी बोलावून घेतले.तिन्ही आरोपी तिच्या घरी आधीच होते. पीडिता सुमोनाच्या घरी पोहोचल्यानंतर आरोपींनी तिच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार केले. पीडिताने विरोध केला असता आरोपींनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडिताने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन संशयितांचा शोध सुरू

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,'पीडित तरुणी आणि आरोपी सुमोना मैत्रीणी आहेत. आरोपी सुमोनाने पीडिताला राहण्यासाठी घरी बोलावले. पीडिता सुमोनाच्या घरी गेल्यानंतर तिथे आधीच असलेल्या तीन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी सुमोना आणि एक आरोपी रोहिदासला अटक केली आहे तर इतर दोन संशयितांचा शोध सुरू आहे.'

महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

'पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणातील इतर दोघांनाही लवकरच अटक केली जाईल. या प्रकरणातील आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३७६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे', अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर