Sahakar Nagar Pune Crime New : पुण्यात सहकारनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य करायला लावून त्याचे फोटो काढून त्रास दिल्याने एका १० मध्ये शिकणाऱ्या मुलाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. ही घटना तळजाई येथे घडली आहे. या प्रकरणी एकावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत राजेश मोहिले (वय २६, रा. भवानी पेठ तसेच मोहननगर, धनकवडी) या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेबर २०२३ ते २५ नोव्हेबर २०२४ दरम्यान घडला आहे.
या घटनेचे वृत्त असे की, फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या मुलगा दहावीमध्ये शिकत होता. आरोपी संकेत मोहिले याने मृत तरुणाला तळजाई येथील टेकडीवर फिरायला नेले. त्या ठिकाणी त्याने त्याचे कपडे काढून मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. यानंतर त्याचे फोटो देखील काढले. दरम्यान, आरोपीने मुलाला त्रास देणे सुरूच ठेवले. त्याला विविध मोबाईलवरुन फोन वरून त्रास देत त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत होता. यामुळे मृत मुलगा हा तणावात होता. त्यामुळे मुलाने सोमवारी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना मुलाच्या वडिलांना कळली. त्यांनी सहकार नगर पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी मुलाविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहकार नगर पोलिस करत आहेत.
पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. यात अल्पवयीन मुलांचा मोठा समावेश आहे. लूटमार, खून, दरोडा या सारख्या घटना रोजच्या झाल्या आहेत. जुन्या वादातून मारामारीच्या घटना देखील वाढल्या आहेत. त्यामुळे या गुन्हेगारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.