मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

May 18, 2024 03:12 PM IST

mahadev betting app case : महादेव बुक ॲप या बेकायदा बेटींग ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून, बेटिंगचा पैसा हवालाच्या माध्यमातून परदेशातही वळविण्यात आल्याचा संशय आहे.

 महादेव बुक ॲप या बेकायदा बेटींग ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून, बेटिंगचा पैसा परदेशातही वळविण्यात आल्याचा संशय आहे.
महादेव बुक ॲप या बेकायदा बेटींग ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून, बेटिंगचा पैसा परदेशातही वळविण्यात आल्याचा संशय आहे. (HT)

mahadev betting app case : महादेव बुक ॲप या बेकायदा बेटींग ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. बेटिंगचा पैसा हवालाच्या माध्यमातून परदेशातही वळविण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नारायणगावातील एका इमारतीत छापा टाकून पोलिसांनी ६२ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. बेटिंगच्या देवाणघेणीसाठी १६ बँकेतील ४५२ खात्याचा वापर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

महादेव बेटींग ॲपच्या माध्यमातून बेकायदा सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर देशभरात कारवाई करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने नारायणगावातील एका इमारतीत छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ४५ लॅपटाॅप, ८९ मोबाइल संच, तसेच आरोपींच्या वापरातील १०१ मोबाइल संच आणि ४५२ बँक खाते पासबुक, अन्य साहित्य असा ६२ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सट्टेबाजीसाठी बँक खात्यांचा वापर

आरोपींनी ऑनलाइन सट्टेबाजीसाठी बँक खात्यांचा वापर केला आहे. ही खाती कोणाच्या नावे काढण्यात आली आहेत, तसेच बनावट कागदपत्रांचा वापर करून खाती काढण्यात आली आहेत का ?, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

Pune Urulikanchan news : वीज पडल्याचा आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

९३ जणांविरुद्ध गुन्हा

महादेव बेटींग ॲप प्रकरणात ९३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ८८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपाससाठी त्यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवण्यात आले आहेत.

याप्रकरणात कुणाल सुनील भट (वय-२८, रा. विवेकानंद नगर, जळगाव), समीर युनुस पठाण (वय-२५, शुक्रवार पेठ, जुन्नर), राशिद कमाल शरीफ फ़ुल्ला (वय-२८, रा. वजीराबाद दिल्ली), अमजद खान सरदार खान (वय-३२, रा. दुर्गागंज जी लखनऊ), यश राजेंद्रसिंग चौहान (वय २६, रा. जयगणेश नगर, जयपूर) यांना अटक करण्यात आली आहे.

सर्व आरोपी पदवीधर

आरोपी नारायणगावातील ऑनलाइन बेटिंगचे कामकाज सांभाळत होते. ते पदवीधर आहेत. पेमेंट प्रोसेसिंग युनिट नारायणगाव येथे कार्यरत होते, पेमेंट वेगवेगळ्या खात्यावर घेऊन ते पुढे पाठवले जात होते.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक, रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, किरण अवचर, सतीश होडगर आणि पथकाने ही कारवाई केली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग