Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान! रूग्णांची संख्या पोहोचली ७३ वर, आरोग्य विभाग अलर्ट!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान! रूग्णांची संख्या पोहोचली ७३ वर, आरोग्य विभाग अलर्ट!

Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान! रूग्णांची संख्या पोहोचली ७३ वर, आरोग्य विभाग अलर्ट!

Jan 25, 2025 08:33 AM IST

GBS Symptoms: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे नवीन रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, जीबीएस ही एक दुर्मिळ आजार आहे. ज्यामुळे अचानक सुन्नपणा येतो आणि स्नायू कमकुवत होतात. बाधित लोकांमध्ये हातपायांमध्ये तीव्र कमकुवतपणासारखी लक्षणे दिसून येतात.

GBS outrage in Mahasrashtra Pune Secrete Syndrome catches in 73 patients
GBS outrage in Mahasrashtra Pune Secrete Syndrome catches in 73 patients (HT_PRINT)

Guillain-Barre Syndrome In Pune: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ७३ जणांना या आजाराची लागण झाली आहे. पुण्यातील तीन रुग्णालयांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला सतर्क केले आहे. नवजात बालकांनाही या आजाराचा फटका बसत आहे. या आजाराबाबत महाराष्ट्र सरकार सतर्क असले तरी हे प्रकरण केंद्र सरकारपर्यंत पोहोचले आहे. हा आजार गिलेन-बार सिंड्रोम (जीबीएस) असल्याचे सांगण्यात आले आहे. हा सिंड्रोम मानवी रोगप्रतिकारक शक्तीला कमी करतो. दिलासा म्हणजे या आजारावर उपचार करता येतात.

मिळालेल्या माहितीनुसार , पुण्यात एका महिन्यात जीबीएसचे एक-दोन रुग्ण येत असतात. परंतु, गेल्या आठवडाभरात जीबीएसग्रस्त १४ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विभागाला सतर्क करून घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले. यावेळी जीबीएसचा कोणी रुग्ण आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच लोकांमध्ये जनजागृतीही करण्यात आली. दोन दिवसांत महापालिका व जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुमारे ७२०० घरांचे सर्वेक्षण केले. एपिडेमिओलॉजी विभागाच्या सहसंचालक डॉ. बबिता कमलपूरकर यांनी सांगितले की, सर्वेक्षणादरम्यान लोकांना या आजाराच्या लक्षणांविषयी माहिती देण्यात आली. जीबीएसच्या लक्षणांमध्ये हातपाय सुन्न होणे आणि दीर्घकाळ अतिसार यांचा समावेश आहे.

तज्ञांचे म्हणणे आहे की रोगजनक जीवाणू कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी जीबीएससाठी जबाबदार आहे. हा आजार लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. हाच बॅक्टेरिया विविध रुग्णालयांतील रुग्णांच्या स्टूल टेस्टमध्ये आढळून आला आहे. या रुग्णांमध्ये आठ वर्षांच्या चिमुकल्याचा आणि एका नवजात अर्भकाचा समावेश असल्याने डॉक्टरांची चिंताही वाढली आहे.



पुण्यातील जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल सर्व्हेलन्स युनिटने (सीएसयू) दखल घेतली आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक पुण्यात पाठविण्यात येत आहे. उपचारासाठी विविध रुग्णालये सज्ज करण्यात येत आहेत. ससून रुग्णालयात १६ जीबीएस रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ७३ रुग्णांपैकी ४४ रुग्ण हे पुणे ग्रामीणमधील आहेत. तर पुणे महापालिका क्षेत्रातील ११ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील १५ जणांचा समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण किरकिटवाडी १४, डीएसके विश्व ८, नांदेड शहर ७, खडकवासला ६ रुग्णांचा समावेश आहे. तीन रुग्ण पाच वर्षांखालील, १८ रुग्ण सहा ते १५ वयोगटातील तर सात रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर