मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune woman rape : संतापजनक! पुण्यात दारूच्या नशेत फुटपाथवरील महिलेवर बलात्कार; डेक्कन बसस्टॉप परिसरातील घटना

Pune woman rape : संतापजनक! पुण्यात दारूच्या नशेत फुटपाथवरील महिलेवर बलात्कार; डेक्कन बसस्टॉप परिसरातील घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 17, 2024 08:00 AM IST

Pune woman rape : पुण्यात महिलावंरील अत्याचयाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. डेक्कन बस स्टॉप परिसरातील एका फुटपाथवर झोपल्या असलेल्या महिलेवर दारूच्या नशेत बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pune woman rape
Pune woman rape

Pune woman rape : वडिलांनी उधार घेतलेले पैसे परत फेडता न आल्याने एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिला देहविक्री करण्यास भाग पाडल्याची घटना ताजी असतांना आत आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डेक्कन बस स्टॉप परिसरात फुटपाथवर झोपल्या असलेल्या एका महिलेवर दारूच्या नशेत एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (दि १५) मध्यरात्री झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पुण्यातील महिला खरच सुरक्षित आहेत का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Maharashtra Weather Update : राज्यावर अवकाळी पावसाचे ढग! 'या' जिल्ह्यात बरसणार; असे असेल हवामान

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी गोविंद रामा घारोळे (वय ३२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही रस्त्यावर फुगे आणि फुले विक्री करते. तसेच रात्री फुटपाथवरच झोपते पीडित महिला ही डेक्कन बस स्टॉपच्या मागील फुटपाथवर झोपते. गुरुवारी रात्री आरोपी हा दारूच्या नशेत आला. त्याने रस्त्यावरच कपडे काढून पीडित महिलेचे कपडे फाडत तिच्यावर बलात्कार केला.

Pune Metro : पुणे मेट्रोचा प्रवास महागणार! वाहनतळासाठी आता पैसे मोजावे लागणार; इतके आहे शुल्क!

दरम्यान, या घटनेनंतर पीडित महिलेने थेट डेक्कन पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिने दिलेल्या तक्रारीवरून गोविंद रामा घारोळे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वी रस्त्यावर भीक मागून उदरर्निवाह करणाऱ्या महिलेवर नातेवाईकांनीच फूटपाथवर बलात्कार केला होता. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कारंहात आला होता.

पुण्यात महिला असुरक्षित

पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बलात्कारारे आणि कौटुंबिक हिंसाचारायचे अनेक प्रकरणं रोज उघड होत आहे. मात्र, या घटना रोखण्यास पोलिस प्रशासन ठरत आहे. यामुले मुलींबरोबर महिलादेखील शहरात असुरक्षित असल्याची भावना आता निर्माण होत आहे.

IPL_Entry_Point

विभाग