मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain: पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस! रस्त्यांना आलं नद्यांचं स्वरुप, पाहा VIDEO

Pune Rain: पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस! रस्त्यांना आलं नद्यांचं स्वरुप, पाहा VIDEO

Jun 08, 2024 06:48 PM IST

Pune Rain : पुण्यातील पर्वती, डेक्कन, पाषाण तसेच अन्य भागात जोरदार पावसाने या भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वीर बाजी पासलकर पुल पाण्याखाली गेला आहे. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून,कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने काही ठिकाणी पूरसदृष्य स्थितीनिर्माण झाली आहे.

पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस! रस्त्यांना आलं नद्यांचं स्वरुप
पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस! रस्त्यांना आलं नद्यांचं स्वरुप

Pune rain : मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं असून राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज पुण्याला जोरदार पावसाचा तडाखा बसला. पुण्यात आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळं शहराच्या काही भागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील रस्त्यांना नद्यांचं रुप आल्याचं दिसून येत होतं. साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगरयेथे ६७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

पर्वती, डेक्कन, पाषाण तसेच अन्य भागात जोरदार पावसाने या भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वीर बाजी पासलकर पुल पाण्याखाली गेला आहे. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून,कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने काही ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. तसेच झाडे पडणे,भिंती पडणे,घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असल्याने पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राज्यात दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

 

जोरदार वारेआणि विजांच्या कडकडाटासह पुण्याला जोरदार पावसाने झोडपून काढले.मान्सून जिल्ह्यात दाखल झाला असून पुढील ४८ तास जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यासह सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक व उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या ३ ते ४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात दोन दिवसापूर्वीत मान्सून कोकणात दाखल झाला होता. आज मान्सूनची पुण्यात एंट्री झाली. पुण्यात सायंकाळनंतर आकाशात ढग जमा होऊ लागले व जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. जोरदार पावसाने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पाण्याचा प्रवाह सर्वत्र वाहत असून, आकाश भरून आले आहे. सकाळपासून उकाडा जाणवत होता. सायंकाळी ५ नंतर मात्र आकाशात ढगांची दाटी झाली आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला.

पुढील दोन दिवसांत मॉन्सून इतर भागात धडक मारेल आणि राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४