मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अंनिसचे श्याम मानव यांची हत्या करण्यासाठी पुण्यात आलेल्या व्यक्तीला शस्त्रासह अटक, राज्यात खळबळ
श्याम मानव 
श्याम मानव 

अंनिसचे श्याम मानव यांची हत्या करण्यासाठी पुण्यात आलेल्या व्यक्तीला शस्त्रासह अटक, राज्यात खळबळ

25 January 2023, 23:03 ISTShrikant Ashok Londhe

shyam manav : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक व संस्थापक प्रा. श्याम मानव यांची हत्या करण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्याने राज्यात खळबळ माजली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर या व्यक्तीला अटक करण्यात आली.

shyam manav Vs Dhirendra maharaj : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वरपीठ धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज व अंधश्रद्धा निर्मुलन समितीमध्ये वाद रंगली आहे. त्यातूनच धीरेंद्र महाराजाच्या भक्ताकडून  अंधश्रद्धा निर्मुलन  समितीचे संस्थापक,  संघटक आणि  प्राध्यापक  श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होता. आज श्याम मानव यांच्या हत्येसाठी महाराष्ट्रात आलेल्या व्यक्तीला  पुण्यात रेल्वे पोलिसांनी अटक  केल्याची माहिती  समोर आली  आहे. हा व्यक्ती सूरतवरून महाराष्ट्रात आला होता. रेल्वे पोलिसांनी त्याला शस्रासहीत अटक केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

अनिलकुमार उपाध्य (वय ४५) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिलकुमार  हा  सुरतवरून  बंदूक घेऊन महाराष्ट्रात  आला होता. पुणे परिसरात  रेल्वे पोलीसांनी  कारवाई  केली आहे.

तुमचाही नरेंद्र दाभोळकर करू अशा धमकीचा एसएमएस श्याम मानव  यांच्या मुलाच्या  मोबाईलवर आला होता. त्यानंतर आज एका व्यक्तीला शस्त्रासह अटक केल्याने खळबळ माजली आहे.

धीरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरिष देशमुख यांनी केला होता. त्यानंतर आज, सुरतवरून अनिलकुमार उपाध्य नावाचा व्यक्ती महाराष्टात आला होता.

त्याच्याकडे विनापरवाना पिस्तुल होतं. त्याला कोर्टाने पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

विभाग